spot_img
अहमदनगरअवैध धंद्याविरोधात पुन्हा हातोडा! जिल्हाभर कारवाई, १३ आरोपींवर गुन्हा

अवैध धंद्याविरोधात पुन्हा हातोडा! जिल्हाभर कारवाई, १३ आरोपींवर गुन्हा

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्याविरुद्ध पोलीस दलाने कंबर कसली असून अवैध दारू विक्रेत्या विरोधात धडाकेबाज कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेने पारनेर, सुपा व कोपरगावमध्ये विनापरवाना देशी, विदेशी व गावठी हातभट्टी अड्ड्यांवर (२१ मार्च) छापे टाकले. यात ११ पुरुष व २ महिला आरोपींवर कारवाई करत २८ हजार १५ रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली.

निवडणुकीच्या अनुशंघाने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि. दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध देशी, विदेशी व गावठी हातभट्टीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांसुर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, अतुल लोटके, राहुल सोळंके, जालिंदर माने, मयुर गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे व मपोकॉ/ज्योती शिंदे आदींची दोन स्वतंत्र पथके नेमून कारवाई सुरु केली.

या पथकांनी पारनेर, सुपा व कोपरगावमध्ये १२ ठिकाणी छापे टाकले. यात २८ हजार १५ रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला. पारनेर पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये मनोहर राहांकले, विश्वास पंढरीनाथ लकडे, सुशांत संतोष साळवे, गणेश रोहिदास खोडदे, अमोल अशाक साठे यांचा समावेश आहे. सुपा पोलिस ठाण्यात चार आरोपी त्यात शमा जावेद शेख, अंजाबापू नारायण मापारी, गजानन जयराम चव्हाण, पोपट किसन आढाव यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दिलीप सखाराम दुनबळे, सोमनाथ लक्ष्मण शिंदे, गवळाबाई चंद्रभान गायकवाड आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी् संपत भोसले, नगर ग्रामीणचे शिरीष वमने आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरोपी रिक्षाने आले, वाट पहिली अन् थेट फायरिंग;…वाचा नेमकं काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री...

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे...

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...