spot_img
तंत्रज्ञानगुजरात टायटन्सची विजयी सलामी! मुंबईचा 'असा' केला पराभव

गुजरात टायटन्सची विजयी सलामी! मुंबईचा ‘असा’ केला पराभव

spot_img

IPL 2024: आयपीएल २०२४ हंगामातील पाचवा सामना (दि.२४) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या रोमहर्षक सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा सहा धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला केवळ १६२ धावा करता आल्या. रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी दमदार खेळी केली. मात्र अखेरच्या षटकात उमेश यादवने हार्दिक पांड्या आणि पियुष चावलाची विकेट घेत सामनाच पलटला. २० षटकात १६२ धावांवर नऊ विकेट घेत गुजरातने मुंबईचा डाव गुंडाळला.

मुंबईला दुसरा धक्का ३० धावांवर बसला. इशान किशननंतर फलंदाजीला आलेला नमन धीर २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले.पहिल्याच षटकात मुंबईची खराब सुरूवात झाली. फलंदाजीला सुरुवात करण्यासाठी आलेला ईशान किशन खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

त्याला अजमतुल्ला उमरझाईने यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या हाती झेलबाद केले. गुजरातने मुंबई इंडियन्सविरुद्ध २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. मुंबईला विजयासाठी १६९ धावांचे आव्हान होते. या सामन्यात जसप्रीत बुमराह सर्वोत्तम ठरला. त्याने चार षटकात १४ धावा दिल्या आणि तीन बळी घेतले.
अजमतुल्ला उमरझाईच्या रूपाने गुजरातला तिसरा धक्का बसला.

१२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीने टिळक वर्माच्या हाती झेल दिला. साई सुदर्शनसोबत तिसर्‍या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. त्याला एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १७ धावा करता आल्या. आठव्या षटकात पियुष चावल्याने शुभमन गिलला रोहित शर्मा करवी झेलबाद केले. शुभमनने २२ चेंडूत ३ चौकार व १ षटकार पटकावत ३१ धावा केल्या. गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी संघाला चांगील सुरुवात करुन दिली. मात्र चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने साहा लीन बोल्ड केले. त्याने १९ धावा केल्या. पाच षटकांनंतर गुजरातने १ गडी गमावत ४७ धावा केल्या

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...