New Financial Year 2024-25: आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असून आजपासून काही नवे नियमही लागू झाले आहेत. या नवीन वर्षात सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
आजपासून एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 30.50 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
सिलिंडरच्या किमतीतील कपातीमुळे बाहेर खाणे आणि पिणे स्वस्त होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती वापरण्यासाठीचा सिलिंडर ८०२.५० रुपयांना मिळत आहे.