spot_img
ब्रेकिंगआनंदाची बातमी आली, महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सून? हवामानशास्त्र विभागाने दिली नवी माहिती,...

आनंदाची बातमी आली, महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सून? हवामानशास्त्र विभागाने दिली नवी माहिती, वाचा सविस्तर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
यंदा भारतात आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मॉन्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. मेपर्यंतच्या हवामानाच्या नोंदी गृहीत धरून देण्यात येणारा मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील हंगामी अंदाज ‘आयएमडी’ ने वर्तवला आहे.

यंदा मान्सून हंगामातील पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के (त्रुटी कमी- अधिक चार टक्के) राहण्याची शक्यता आहे.जून महिन्यात देशभरात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण (महिन्याच्या सरासरीच्या ९२ ते १०८ टक्के) राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह दक्षिण भारताच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त, तर उत्तर भारत आणि मैदानी क्षेत्रामध्ये जूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. रेमल चक्रीवादळाची तीव्रता सोमवारी कमी झाली असून, पुढील दोन दिवसांत वादळाचा प्रभाव ओसरण्याची शक्यता आहे.

त्यामुळे येत्या पाच दिवसांत मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या विस्तारित अंदाजानुसार, मान्सूनच्या केरळमधील आगमनानंतर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सक्रिय राहणार असून, सहा ते १३ मे या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रापर्यंत दाखल होऊ शकतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; कारणही सांगितलं

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी...

आरोपी रिक्षाने आले, वाट पहिली अन् थेट फायरिंग;…वाचा नेमकं काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री...

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे...