spot_img
अहमदनगरस्वतःच्या घरात गांजा विक्री करणारा ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

स्वतःच्या घरात गांजा विक्री करणारा ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

spot_img

अहमदनगर। नगरसह्याद्री-
राहत्या घरी गांजा ठेवून त्याची विक्री करीत असल्याचे समजल्याने सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील मंजूर या गावी अवैध गांजा बाळगणारर्‍या संबंधित व्यक्तीच्या घरावर छापा मारून एक लाख ०६ हजार १५० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. तसेच आरोपी प्रदीप बाजीराव पायमोडे (वय-३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, अंमलदार बाळासाहेब मुळीक, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, उमाकांत गावडे व कॉन्स्टेबल प्रियंका चेमटे यांचे पथक नेमून त्यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले. हे पथक कोपरगांव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणार्‍या इसमांची माहिती काढत असतांना सपोनि हेमंत थोरात यांना ३१ मार्च प्रदीप बाजीराव पायमोडे (रा. मंजुर, ता. कोपरगांव) हा स्वत:च्या घरी गांजा विक्री करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक संदीप कोळी व सहकारी तसेच पंच यांना घेऊन छाप्याचे नियोजन केले.

संबंधित पथकाने लागलीच मंजूर येथे जाऊन संशयित प्रदीप पायमोडे याच्या घरावर छापा घातला. तेव्हा पायमोडे हा घरात लोखंडी कॉटवर बसलेला दिसला. त्यास पथकाची ओळख सांगून विचारले असता त्याने त्याचे नाव प्रदीप बाजीराव पायमोडे असे असल्याचे सांगितले. त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता घरातील कॉटवर पिवळ्या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेल्या बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला आढळून आला. पथकाने या बाबत विचारणा केली असता त्याने तो पाला गांजा असून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.

तेव्हा पथकाने एक लाख ०६ हजार १५० रुपये किमतीचा १० किलो ७३२ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. संबंधित प्रदीप पायमोडे या आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब अशोक गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पायमोड यास जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...