spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी 'गांगर्डे' दाम्पत्याचा 'मोठा' निर्णय

ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी ‘गांगर्डे’ दाम्पत्याचा ‘मोठा’ निर्णय

spot_img

कर्जत | नगर सह्याद्री

आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. आरक्षणास विलंब होत असल्याने अनेकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. याच दरम्यान कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सदस्या अश्विनी शरद गांगर्डे यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांचे पती भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका सरचिटणीस शरद चंद्रभान गांगर्डे यांनी देखील आपल्या पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्या अश्विनी गांगर्डे यांनी आपला सदस्य पदाच्या राजीनामाचे पत्र गटविकास अधिकारी, तहसिलदार कर्जत, ग्रामसेवक निमगाव गांगर्डा यांना पाठविले आहे.

शरद गांगर्डे यांनी आपल्या कर्जत तालुका भाजपा सरचिटणीस पदाच्या राजीनामाचे पत्र भाजपाचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांना पाठविले आहे.निमगाव गांगर्डा सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे.

त्या पाठोपाठ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या अश्विनी शरद गांगर्डे यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या सदस्याचा तर शरद गांगर्डे यांनी पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय...

अहमदनगर जिल्हा बँकेत मोठी नोकर भरती; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…

अहमदनगर / नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी...

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला सोलापूर | नगर सह्याद्री स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा...

विधानसभा निवडणूक; नव्या सर्व्हेच्या अंदाजाने मविआची चिंता वाढली; काय आहे अंदाज पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची...