spot_img
देशगरिबांना मोफत रेशन, 'त्या' महिलांना १५ हजार मानधन.. पहा आज मोदी मंत्रिमंडळाने...

गरिबांना मोफत रेशन, ‘त्या’ महिलांना १५ हजार मानधन.. पहा आज मोदी मंत्रिमंडळाने घेतलेले महत्वाचे निर्णय

spot_img

दिल्ली / नगर सह्याद्री :
modi mantrimandal baithak : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गरीब कल्याण अन्न योजनेचा कार्यकाळ पुढील पाच वर्षांसाठी वाढविण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

ही योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. याशिवाय ड्रोन सखी योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कोरोना काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात केली गेली होती. १ जानेवारी २०२४ नंतर पुढील पाच वर्षे या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ड्रोन सखी योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून ड्रोनद्वारे शेतात कीटकनाशकांची फवारणी केली जाणार आहे.ही महिलांसाठी खास योजना असून ड्रोन उडवणाऱ्या महिलेला दरमहा १५ हजार रुपये आणि सहाय्यकाला १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

ही योजना २०२६ पर्यंत सुरू राहणार असून त्यासाठी १,२६१ कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच १६ वा वित्त आयोगाचा कार्यकाळ मार्च २०२६ पर्यंत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...