spot_img
अहमदनगरशनी शिंगणापूर येथे शनी दर्शनासाठी आता भुयारीमार्ग, असे असेल नियोजन

शनी शिंगणापूर येथे शनी दर्शनासाठी आता भुयारीमार्ग, असे असेल नियोजन

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे शनिदेवांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. याठिकाणी आता भुयारी मार्गाद्वारे दर्शन रांग असेल.

भुयारी मार्गाने नवीन दर्शन पथास काल अर्थात बुधवारी प्रारंभ झाला. मुख्य रस्त्यापासून सुरू होणारी जुनी दर्शन रांग बंद करण्यात आली आहे. आता या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या पानसनाला तीर्थ प्रकल्प योजनेतील भुयारी मार्गाने दर्शन रांग असणार आहे.

असा असेल मार्ग
देवस्थानच्या वाहन तळापासून सुरू होणार्‍या भुयारी मार्गाने भाविक महाद्वारासमोर निघतील. येथून जुन्या दर्शनपथ इमारती मधून भाविक दर्शनाकरता जातील. या प्रकल्पामध्ये दशावतार मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. दीपस्तंभ, नवग्रह मंदिराचे दर्शन घेता येईल. चाळीस फुट रुंद व आठशे फुट लांबीचा हा दर्शन पथ बनवण्यात आला आहे. दर्शन करून बाहेर जाण्याच्या मार्गावर बगीचा, पानसनाला प्रकल्प, सप्ततीर्थ बंधारा, सेल्फी पॉईंट आदी बनवण्यात आले आहेत.

मोठा महिमा
शनिदेवांचा महिमा मोठा आहे. येथे हजारो भाविक देशभरातून दर्शनासाठी येत असतात. प्रसिद्ध से जागृत देवस्थान आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...