spot_img
महाराष्ट्रराजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत, 'तो' बडा नेता व अजित पवार यांचा एकाच...

राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत, ‘तो’ बडा नेता व अजित पवार यांचा एकाच गाडीने प्रवास

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. आता येणाऱ्या काही दिवसात काही राजकीय भूकंप घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
मोठमोठे नेते आपले पक्ष सोडून वेगळ्या पक्षात पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील एका बड्या नेत्यासोबत एकाच गाडीने प्रवास केला असल्याचे वृत्त आले आहे. याच नेत्याला अजित पवार गटातून लोकसभा निवडणुकीची उमेदवारीची संधी दिली जाण्याची चर्चा आहे. हा बडा नेता म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी आढळराव पाटील. शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतंच त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. विविध विकासकामांचं उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्यासाठी या तीनही नेत्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर तीनही नेत्यांनी एकाच गाडीने प्रवास केला. या भेटीवर अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. विशेष म्हणजे शिरुर लोकसभेच्या जागेतून शिवाजी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची देखील घोषणा आता होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करुन घड्याळ चिन्हावर निवडून आणण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांची तयारी आहे, अशी सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे. पण शिवाजी आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आक्षेप घेतलाय. शिवाजी आढळराव पाटील यांनी आपल्याला जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यासोबत आपलं अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर आपण राजकारण सोडू असं मोहिते पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...