spot_img
अहमदनगर'कोतवाली' च्या सतर्कतेमुळे गुन्हा टळला! बंदुकीसह एक जण 'असा' अडकला जाळयात

‘कोतवाली’ च्या सतर्कतेमुळे गुन्हा टळला! बंदुकीसह एक जण ‘असा’ अडकला जाळयात

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
अमरधाम रोडवरून गुन्ह्याच्या तयारीत असणार्‍या आरोपीस कोतवाली पोलिसांनी बंदुकीसह ताब्यात घेतले. २४ मार्चला रात्री १० वाजता घडली. राकेश राजू ठोकळ (वय २३ वर्षे, रा.लालटाकी, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याकडून ३० हजार रुपयांचे लोखंडी स्टील कलरचे गावठी बनावटीचे अग्निशस्र, एक हजार रुपयांचे दोन काडतुसे असा ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अधिक माहिती अशी : कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना वरील ठिकाणी एक इसम कमरेला अग्निशस्र लावून काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने उभा असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे सपोनि योगिता कोकाटे व पोलीस स्टाफ यांना कारवाई करणेबाबत आदेशीत केले. सपोनि योगिता कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस त्या इसमाला पकडत असताना थोडी झटपट झाली. परंतु पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले.

पो.कॉ. शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे सपोनिरी. योगीता कोकाटे, पो.हे.कॉ. तनवीर शेख, शाहीद शेख, संदिप पितळे, पो.ना. अविनाश वाकचौरे, म.पो.ना. संगिता बडे, पो.कॉ. दीपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अमोल गाडे, सुजय हिवाळे आदींनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...