spot_img
आर्थिकतुमचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते आहे? होऊ शकतात 'हे नुकसान

तुमचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते आहे? होऊ शकतात ‘हे नुकसान

spot_img

नगर सह्याद्री टीम : आजकाल प्रत्येकाचेच बँकेत खाते असते. परंतु अनेक लोक आपले अनेक बँकेत खाते उघडून ठेवत असतात. तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर ही बातमी नक्की वाचा. एकाधिक बँक खात्यांसह, तुमचे आर्थिक नुकसान तसेच इतर अनेक नुकसान होऊ शकते. कर आणि गुंतवणूक तज्ञ देखील एकच खाते ठेवण्याचा सल्ला देत असतात. ते सांगतात की एकच बँक खाते असल्‍याने रिटर्न भरणे सोपे होते. एकापेक्षा जास्त खाती असण्याचे तोटे जाणून घेऊया.

काय होईल नुकसान?
अनेक बँकांमध्ये खाते सुरू ठेवल्यास पहिला तोटा होतो तो मेंटेनन्सचा. वास्तविक, प्रत्येक बँकेचे स्वतःचे स्वतंत्र मेंटिनेंस चार्ज, डेबिट कार्ड चार्ज, एसएमएस चार्ज, सेवा चार्ज, किमान शिल्लक चार्ज असतो. म्हणजेच तुमची जितक्या बँकांमध्ये खाती आहेत, त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे शुल्क भरावे लागेल. तसेच मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास बँका त्यासाठी भारी शुल्क आकारतात.

सिंगल बँक खात्यात रिटर्न भरणे सोपे
कर तज्ज्ञांच्या मते, तुमचे सिंगल बँक खाते असल्यास रिटर्न भरणे सोपे जाते . कारण तुमच्या कमाईची संपूर्ण माहिती एकाच खात्यात उपलब्ध असते. वेगवेगळी बँक खाती असल्याने हे कॅल्क्युलेशन अवघड आणि मोठे होते. अशा परिस्थितीत कर विभाग तुम्हाला नोटीस बजावू शकतो. अशा समस्या सोडवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारन यांनी या अर्थसंकल्पात नवीन प्रणालीची घोषणा केली होती.

खाते इनएक्टिव होईल
बचत खात्यात किंवा चालू खात्यात वर्षभर कोणताही व्यवहार न केल्यास ते Inactive Bank Account मध्ये बदलते. दोन वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार न झाल्यास, ते Inoperative खात्यात रूपांतरित होते. अशा बँक खात्यांसोबत फसवणूक होण्याची शक्यता वाढते. बँकर्सचे म्हणणे आहे की या सक्रिय खात्यांमुळे अंतर्गत आणि बाह्य फसवणूक होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

खासगी बँक एक्स्ट्रा चार्ज आकारते
खाजगी बँकांचे किमान शिल्लक शुल्क खूप जास्त आहे. उदाहरणार्थ, HDFC बँकेची किमान शिल्लक 10 हजार रुपये आहे. ग्रामीण भागासाठी 5000 रुपये आहे. ही शिल्लक न ठेवल्यास दंड पडतो. इतर खाजगी बँकांसाठीही असेच शुल्क लागू आहे. जर तुम्ही चुकून किमान शिल्लक राखली नाही, तर तुम्हाला दरमहा शेकडो रुपये विनाकारण दंड म्हणून द्यावे लागू शकतात. याचा तुमच्या CIBIL स्कोअरवरही परिणाम होतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...