spot_img
महाराष्ट्रलोकशाहीचे अधःपतन झाले ! राष्ट्रवादीसंबंधी निकालानंतर घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया, वाचा..

लोकशाहीचे अधःपतन झाले ! राष्ट्रवादीसंबंधी निकालानंतर घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया, वाचा..

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेची घटना व राष्ट्रवादीची घटना वेगळी आहे. परंतु निवडणूक आयोगाने बहुमत कोणाच्या बाजूने? हे पाहून निकाल दिला.

शरद पवार गट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल हेही नक्की. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जो निकाल दिला, त्यावर आता घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया आली आहे.

“कालच्या निकालामुळे लोकशाहीची अधःपतन झालं आहे. शिवाय घटनेची पायमल्ली झाली आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द झाला पाहिजे. शिवाय कोर्टाने पक्षांतरबंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे. ज्याच्याकडे बहुमत त्याच्या बाजूने निकाल देणे चुकीचे आहे” असं उल्हास बापट म्हणाले.

“कालच्या निकालाचा विधानसभा अध्यक्षांवर परिणाम होणार नाही, मात्र ते काय निकाल देतील ते आपल्याला माहिती आहे” असं उल्हास बापट म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...