संस्थेच्या आवारात आढळले जखमी हरीण
जामखेड । नगर सहयाद्री
रत्नदीप मेडिकल फौडेशन संस्थेच्या आवारात जखमी हरीण सापडले. सदर हरीण संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनीच पाळले असल्याचे वनविभागाच्या तपासात आढळून आले असल्यामुळे वनविभागाने १९७२ वन्यजीव कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. चार दिवसात डॉ. मोरे याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
जखमी हरणावर वनविभागाने जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचार केले.जामखेड कर्जत रस्त्यावरील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये सहा महिन्याचे जखमी हरीण असल्याची माहिती कर्जत जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना मिळाली होती.
त्यानुसार सहायक वनसंरक्षक गणेश मिसाळ राहुरी, दक्षता पथक डि एम बडे, बी एस भगत वनरक्षक प्रवीण उबाळे, रवी राठोड, शांतीनाथ सपकाळ, नागेश तेलंग यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत जखमी हरणास ताब्यात घेत जखमी हरणावर उपचार केरण्यात आले. तपासादरम्यान जखमी हरीण रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांनी पाळले असल्याची समोरआल्यामुळे १९७२ च्या वन्यजीव नियमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.