spot_img
अहमदनगरआमदार लंकेंवर शहर काँग्रेस नाराज! मेळाव्यापूर्वीच पाथर्डीतून काढता पाय, नेमकं काय घडलं?...

आमदार लंकेंवर शहर काँग्रेस नाराज! मेळाव्यापूर्वीच पाथर्डीतून काढता पाय, नेमकं काय घडलं? पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नीलेश लंके यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सोमवारी मोहटा देवी येथून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ झाला. पाटील यांची भेट घेत शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांनी कार्यकर्त्यांसह पाथर्डी शहरात स्वागत केले. मात्र, मेळाव्यापूर्वीच शहर काँग्रेसने पाथर्डीतून काढता पाय घेतला. त्यामुळे लंके यांच्यावर शहर काँग्रेस नाराज असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी सात वाजता अहमदनगर शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. नगर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सक्रिय झाले आहेत. ते शहराच्या विविध भागांमध्ये भेटीगाठी देताना पहायला मिळत आहेत.

शहर उद्धव ठाकरेशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते लंके यांच्या समवेत सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. मात्र शहरातील काँग्रेस लंके यांच्यापासून दूर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहर काँग्रेसच्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे म्हणाले की, माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये काँग्रेस भक्कमपणे काम करते आहे. शहरातील दहशत आणि शहराचा विकास या मुद्द्यांवरती निर्भीडपणे जनहितासाठी काँग्रेस आवाज उठवत आहे.

लोकसभा निवडणूक ही देशासाठी महत्त्वाची आहे. संविधान धोयात आले आहे. अशा वेळी हुकूमशाहीचा पराभव करणे गरजेचे आहे. बैठकीत प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले जाणार असून त्यानंतर पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...