spot_img
ब्रेकिंगRain update: हिवाळ्यातही पावसाची शक्यता! भारतीय हवामानशास्त्र विभागाचा 'असा' अंदाज

Rain update: हिवाळ्यातही पावसाची शक्यता! भारतीय हवामानशास्त्र विभागाचा ‘असा’ अंदाज

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
जानेवारी ते मार्च या हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शयता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. जानेवारीमध्ये राज्यात किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे. चालू हंगामात राज्यात अद्याप थंडीच्या लाटेचा अनुभव आला नसताना जानेवारीतही हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

आयएमडीतर्फे सोमवारी आगामी हिवाळी हंगामातील पाऊस आणि जानेवारीच्या तापमानाचा अंदाज जाहीर करण्यात आला. त्यानुसार देशभरात जानेवारी ते मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शयता वर्तवली आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, मध्य भारतासह महाराष्ट्रात आगामी तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शयता आहे.

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शयता ७५ टक्के आहे. जानेवारीत देशाच्या बहुतांश भागांत रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शयता आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शयता ६५ टक्के आहे.

थंडीची जाणीव होण्यासाठी किमान तापमानासोबतच कमाल तापमानाचाही पारा उतरण्याची गरज असते. यंदा डिसेंबरमध्ये थंडीने हुलकावणी दिल्यानंतर जानेवारीमध्येही थंडी फारशी अनुभवायला मिळणार नाही, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण विभागात किमान तापमान सरासरीहून अधिक असू शकते. या काळात केवळ किमान नाही तर कमाल तापमानही अधिक असू शकेल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीहून किंचित कमी असू शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...