अहमदनगर | नगर सह्याद्री-
गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ५ लाख ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबून ठेवून त्यांची कत्तल केली जातअसल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्यांना छापा टाकून कारवाईचे आदेश दिले.
पथकाने कारी मस्जिदजवळ सार्वजनिक स्वछता गृहाजवळ झेंडीगेट येथे शोध घेतला असता एका बंद दरवाजा असलेल्या घरातून काही तरी तोडल्याचा आवाज आला. पाहणी केली असता तेथे गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले अंदाजे २००० किलो गोमांस आढळले.
त्याच परिसरात शोध घेतला असता शाळा क्रं ४ मागे अंधारात एकुण ८ गोवंशीय जनावरे आढळली. एकुण ५ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कत्तल कारणारे फैसल अस्लम शेख (वय १९, रा. झेंडीगेट), राशीद इलीयास कुरेशी (वय २२ रा. नालबंद खुंट), औवेस राशीद शेख (वय २४, रा. आंबेडकर चौक), रहेमुद्दीन महेबूब कुरेशी (वय २६, रा. बाबा बंगाली), मुसाविर युनुस कुरेशी (वय २१ रा. बाबा बंगाली) मोहमीद नजिर एहमद कुरेशी (वय २३, रा.आंबेडकर चौक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.