spot_img
ब्रेकिंगBreaking : ठाकरे कुटुंबाला सरकारने घेरलं ! मुंबई महापालिकेच्या 25 वर्षाच्या...

Breaking : ठाकरे कुटुंबाला सरकारने घेरलं ! मुंबई महापालिकेच्या 25 वर्षाच्या कारभाराच्या चौकशीचे दिले आदेश

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : शिंदे सरकारने ठाकरे कुटुंबाला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी पाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत.

मुंबई मनपाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णयच शासनाने घेतला असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अडचण होईल असे म्हटले जात आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. हिंमत असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनता तुमच्या कामांचे ऑडिट करेल असा हल्ला ठाकरे गटाने केलाय.

उदय सामंत यांनी दिली ‘ही’ माहिती
मुंबई महानगरपालिकेमधील कोव्हीड काळातील झालेला गैरव्यवहार समोर आला होता. तसेच इतर अनेक गैरव्यवहाराचे आरोप होत असल्याने मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामंत म्हणाले. मुंबई मनपाच्या सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी श्वेतपत्रिका काढणार आहे असे उदय सामंत यांनी सांगितले. त्यानंतर विरोधकांनी पुणे, ठाणे, नागपूर आणि इतर मनपाच्या चौकशीची मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय...

अहमदनगर जिल्हा बँकेत मोठी नोकर भरती; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…

अहमदनगर / नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी...

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला सोलापूर | नगर सह्याद्री स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा...

विधानसभा निवडणूक; नव्या सर्व्हेच्या अंदाजाने मविआची चिंता वाढली; काय आहे अंदाज पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची...