spot_img
देशमोठी बातमी ! लोकसभेसोबत 'या' चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखाही होणार जाहीर

मोठी बातमी ! लोकसभेसोबत ‘या’ चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखाही होणार जाहीर

spot_img

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणुकांच्या तारखा शनिवारी म्हणजे उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. लोकसभा निवडणुकांसोबतच सिक्किम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्याही तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. लोकसभेचा कार्यकाळ १६ जूनला संपत आहे, त्याआधी निवडणुका पूर्ण होण्याची आवश्यकता आहे.

नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. सर्व विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षानेही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. गेल्या वेळी 2019 मध्ये, सार्वत्रिक निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांत पार पडल्या आणि 23 मे रोजी मतमोजणी झाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

अहमदनगर | नगर सह्याद्री उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात...

पदाधिकारी नॉट रिचेबल? पारनेरची सेनापती बापट पतसंस्था व्हेंटीलेटरवर!

ठेवीदारांच्या रांगा | हवालदिल ठेवीदारांची केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार | पदाधिकारी नॉट रिचेबल पारनेर |...

अमेरिकेतही डॉ. दीपक यांच्या संशोधनाला सन्मानाचा ‘दीप’

अहमदनगर | नगर सह्याद्री अमेरिकेतील व इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्यावतीने श्वसन प्रणालीमध्ये...

…म्हणून नगरमध्ये विजय महायुतीचाच होणार! खासदर विखे पाटलांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

श्रीगोंदा | नगर सह्याद्री अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार...