spot_img
अहमदनगरगय केली जाणार नाय!! नगरच्या आखाड्यात पैलवान आमदार लांडगे यांचा इशारा

गय केली जाणार नाय!! नगरच्या आखाड्यात पैलवान आमदार लांडगे यांचा इशारा

spot_img

अहमदनगर। नगर सह्याद्री-
नगर जिल्ह्यात अनेक काळ्या कृत्याचा घटना घडत आहे. अन्याय करणारे व त्यांना मदत करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही असा इशारा हिंदुत्ववादी नेते पैलवान आमदार महेश लांडगे यांनी दिला.

सोनई येथे एका प्रार्थनास्थळी पास्टर ने केलेल्या काळ्या कृत्याचा निषेध, मुस्लिम वक्फ बोर्ड रद्द झाला पाहिजे, धर्मांतरबंदी कायदा लागू झाला पाहिजे, धर्मातरासाठी बाहेर देशातून येणारी फंडिंगवरती बंदी घालावी या मागण्यांसाठी नेवासा शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चाची शनिवारी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

आमदार लांडगे म्हणाले, अन्याय झाल्यावर एकत्र येण्यापेक्षा कायमस्वरूपी हिंदूंनी एकत्र या, आम्ही न्याय मागतो म्हणजे जातीय तेढ निर्माण करतो असे नाही. कोणत्याही नेत्याने नराधमांना फाशी द्या अशी मागणी केली नाही याचे दुःख वाटते. असा प्रकारच्या घटनांचे परिणाम आपल्या भावी पिढ्यांवर होतात याची हिंदूंनी काळजी घ्यावी. जाती पातीत विभागून न जाता हिंदू म्हणून जगा. आमची जात आणि धर्म फक्त हिंदूच असे ते यावेळी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...