spot_img
ब्रेकिंगवाकचौरे यांची उमेदवार जाहीर होताच 'यांची' बंडाची तयारी तर 'ते' पुन्हा मातोश्रीवर

वाकचौरे यांची उमेदवार जाहीर होताच ‘यांची’ बंडाची तयारी तर ‘ते’ पुन्हा मातोश्रीवर

spot_img

शिर्डी। नगर सहयाद्री-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याही नावाची घोषणा केली. परंतु भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेसह महाविकास आघाडीसह इतर पक्षातून जोरदार विरोध होऊ लागला आहे.

भाऊसाहेब वाकचौरेंविरोधात शिवसेनेचे समन्वयक अशोक गायकवाड यांनी मातोश्री गाठली, तर काँग्रेसच्या ऊत्कर्षा रूपवते या देखील बंडाचे हत्यार उपसले आहे. अशोक गायकवाड यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर होताच, त्यांनी ’मातोश्री’कडे धाव घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला.

ठाकरे यांचा विश्वासघात वाकचौरे यांनी केल्याची आठवण करून दिली. तसेच तूप घोटाळ्याची वाकचौरे यांचा कसा संबंध आहे, देखील निर्दशनास आणून दिले. पक्षाने अजून देखील वाकचौरे यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा, अशी गळ घातली. याशिवाय वाकचौरे यांना संधी न देता चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी अशोक गायकवाड यांनी केली. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या महिला आयोगाच्या सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या ऊत्कर्षा रूपवते देखील भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर नाराज झाल्या आहेत. महाविकास आघाडीतून नवीन उमेदवाराला संधी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष या निवडणुकीत एकत्रित आणि एक दिलाने काम करणार असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात माझ्या पाठिशी आहेत, असा दावा भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला आहे. विद्यमान खासदारांना मतदारसंघातील ९० टक्के लोक ओळखत नाही. तूप घोटाळ्याबाबत सतत आरोप होतो. त्याचे योग्य वेळी उत्तर देणार असल्याचा इशारा भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंचे लंकेंबद्दल सुचक विधान, पवारांचा देखील घेतला समाचार

अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार...

सुजय विखे-नीलेश लंके यांच्यात मोठी चुरस; कुठे काय घडलं पहा सविस्तर…

अहमदनगर | नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान (सोमवारी) पार पडले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात...

पैसे वाटपावरून पारनेरमध्ये गोंधळ! दोन्ही गटांने घेतली टोकाची भूमिका, पहा काय घडलं

पारनेर | नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु असून यात अहमदनगर...

‘आधी लग्न लोकशाहीचे’ नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क

अहमदनगर । नगर सहयाद्री राज्याचं लक्ष अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर आहे. याच पार्श्वभूमीवर आज नगर-शिर्डी लोकसभा...