spot_img
अहमदनगरAhmednagar News: ‘जय श्रीराम’ म्हणत अण्णांनी स्वीकारली साखर!! खा. विखे यांच्या 'या'...

Ahmednagar News: ‘जय श्रीराम’ म्हणत अण्णांनी स्वीकारली साखर!! खा. विखे यांच्या ‘या’ आठवणींना दिला उजाळा

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
खा. सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा. विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान करत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ शिदा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या निमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी साजरा करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने आपण खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिदा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खा. विखे यांनी अण्णांना दिली.

किटमध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आहे. अण्णांना हे किट प्रदान करण्यात आले. ‘अण्णा मी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा, यासाठी साखर-डाळ शिदा भेट देत आहे. आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात. त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे, असे खा. सुजय विखे यांनी सांगितले. अण्णांनीही यावेळी खा. विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट हसत स्वीकारली. तसेच किटमध्ये काय-काय वस्तू आहेत, याची उत्सुकतेने पाहणी केली.

या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केल्याचे अण्णांनी यावेळी नमूद केले. तसेच खा. सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर-डाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी काशिनाथ दाते, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का? मनोज जरांगे यांचा मराठा नेत्यांवर संताप

छत्रपती संभाजीनगर। नगर सह्याद्री- मराठा समाजाचे सर्वपक्षीय जे आमदार, मंत्री आहेत त्यांनी सगेसोयरे यांच्याबाबत अधिवेशनात...

दहा टक्के मराठा आरक्षणास हायकोर्टात आव्हान? ‘यांनी’ केली याचिका दाखल

मुंबई। नगर सहयाद्री- राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा...

ब्रेकिंग : नगर पुणे महामार्गावर अपघात!! खचाखच भरलेल्या बसमधले ‘इतके’ प्रवासी जखमी

सुपा / नगर सह्याद्री नगर पुणे महामार्गावर लक्झरी बस व ट्रकचा भिषण अपघात झाला असुन...

भाजपचं ठरलं? गांधीनगरमधून गृहमंत्री शहा तर पंतप्रधान ‘मोदी’ ‘या’ मतदार संघातून लढणार

2024 Lok Sabha Elections: आगमी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सूत्राच्या...