spot_img
अहमदनगर'आमदार जगताप यांची 'अहमदनगर' चे समन्वयक म्हणून नियुक्ती'

‘आमदार जगताप यांची ‘अहमदनगर’ चे समन्वयक म्हणून नियुक्ती’

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांची पक्षाकडून समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी ही नियुक्ती केली आहे.

१८ एप्रिलपासून अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवडणुकीसाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

महायुतीमधील घटक पक्ष कामाला लागले असून त्यानूसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी निवडणुकीतील समन्वयक म्हणून नगर शहराचे पक्षाचे आ. संग्राम जगताप यांची नियुक्ती केली आहे. आ. जगताप यांनी महायुतीमधील आजी-माजी नेतेमंडळी यांच्याशी समन्वय ठेवून प्रचार यंत्रणा राबवून, महायुतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिल्या आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

अहमदनगर | नगर सह्याद्री उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात...

पदाधिकारी नॉट रिचेबल? पारनेरची सेनापती बापट पतसंस्था व्हेंटीलेटरवर!

ठेवीदारांच्या रांगा | हवालदिल ठेवीदारांची केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार | पदाधिकारी नॉट रिचेबल पारनेर |...

अमेरिकेतही डॉ. दीपक यांच्या संशोधनाला सन्मानाचा ‘दीप’

अहमदनगर | नगर सह्याद्री अमेरिकेतील व इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्यावतीने श्वसन प्रणालीमध्ये...

…म्हणून नगरमध्ये विजय महायुतीचाच होणार! खासदर विखे पाटलांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

श्रीगोंदा | नगर सह्याद्री अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार...