spot_img
महाराष्ट्रअजित पवार गटाने लोकसभेसाठी बारामतीसह मागितल्या 'या' ९ जागा, संभाव्य उमेदवारही समोर?...

अजित पवार गटाने लोकसभेसाठी बारामतीसह मागितल्या ‘या’ ९ जागा, संभाव्य उमेदवारही समोर? पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे आता राजकीय वातवरण देखील तापू लागले आहेत. महायुतीमध्ये अर्थात फडणवीस-पवार-शिंदे सरकारमध्ये जागा वाटपावरून रणकंदन सुरु झाले आहे. आता लोकसभेसाठी नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याचीच माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादीकडील सध्या असणाऱ्या चार जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागा त्यांनी मागितल्या आहेत. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून अजित पवार गट धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया, छत्रपती संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रही असल्याचे समजते.

रायगड लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून सुनिल तटकरे यांचे नाव समोर येत आहे. या जागेवर भाजपने सुद्धा दावा केला आहे.

संभाव्य उमेदवारांची नावे
बारामती – सुनेत्रा पवार
सातारा – रामराजे नाईक निंबाळकर
रायगड – सुनिल तटकरे
शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील
दक्षिण मुंबई – काँग्रेसमधील बडा चेहरा
परभणी- राजेश विटेकर
भंडारा गोंदिया – प्रफुल्ल पटेल
धाराशिव – राणा जगजितसिंह
छत्रपती संभाजीनगर – सतीश चव्हाण

लोकसभेसाठी जय्यत तयारी
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी या सर्वानीच कंबर कसली आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तेच मागील काही दिवसांपासून अनेक भेटीगाठी देखील सुरु आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाची प्रतिक्षा लांबणीवर!

मुंबई | नगर सह्याद्री आता संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने...

Ahmednagar Crime: धक्कादायक! केसेस करता म्हणून दिव्यांगाला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर। नगर सहयाद्री केसेस करतो म्हणून दिव्यांग व्यक्तीला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला....

Accident News: पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये कारचालकाने तिघांना उडवलं!

नागपूर । नगर सहयाद्री- पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना...

Ahmednagar Crime: लिफ्ट देण्याच्या बहाणा,अन भलताच कुटाणा? नगरच्या युवका सोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटले. तसेच,...