spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : निघोज, अळकुटी गटांसाठी सचिन वराळ पाटील यांचे नेतृत्व भक्कम...

Ahmednagar Politics : निघोज, अळकुटी गटांसाठी सचिन वराळ पाटील यांचे नेतृत्व भक्कम : खा.विखे

spot_img

निघोज / नगर सह्याद्री : अळकुटी जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शालिनी विखे यांच्या माध्यमातून संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली आहेत. वराळ पाटील एक भरभक्कम नेतृत्व असल्याचे पाच वर्षात सिद्ध झाले आहे असे प्रतिपादन खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

निघोज परिसरातील निघोज – अळकुटी – गारखिंडी या रस्त्याचे १२ कोटी रुपये निधी उपलब्ध झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेल्या शाळा खोल्यांचे लोकार्पण, तसेच कपिलेश्वर मंगल कार्यालयात साखर व डाळ वाटपाचा प्रारंभ शुक्रवार दि. १९ रोजी खासदार विखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखीले, वडनेरचे सरपंच राहुल सुकाळे, माजी सरपंच भाऊसाहेब डेरे, पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर, युवा नेते अमोल सालके, सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर के वराळ पाटील, निघोज व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. डॉ. विखे पाटील यावेळी म्हणाले, माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांनी जशाप्रकारे विकास कामे करत संपर्क ठेवला त्याच प्रकारे सचिन वराळ पाटील यांनी त्यांची यंत्रणा सक्षमपणे राबवली आहे. मागील पाच वर्षात जिल्हा परिषद गटातील जनतेचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला आहे. गाव व परिसरातील लोकसंख्या मोठी आहे. या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची खऱ्या अर्थाने गरज आहे. सचिन वराळ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी ही मागणी केली आहे. ती मागणी लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.‌ दि. २२ जानेवारीला अयोध्येत राम प्रतिष्ठापणा होणार असून साखर व डाळीपासून लाडू बनवून महाप्रसाद बनवावा असे आवाहन विखेंनी केले.

सचिन वराळ पाटील म्हणाले की, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांनी आम्हाला भरभरून दिले आहे. निघोज – अळकुटी – गारखिंडी बारा कोटीचा रस्ता, २९ कोटी रुपयांची जलजीवन शुद्ध पाणीपुरवठा योजना, तसेच जिल्हा परिषद शाळा विकासासाठी मोठा निधी अशाप्रकारे कोट्यवधींचा निधी दिला आहे.

यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, पारनेर तालुका पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघाच्या पारनेर तालुका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तसेच डिजिटल चावडी सेवाभावी संस्था यांच्या वतीने खासदार डॉ.विखे पाटील यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू साबळे यांनी तर अस्लमभाई इनामदार यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...