अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकांमध्येही माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले हेच किंगमेकर ठरले आहेत.
नगर तालुक्यात राजकियदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि.५) दुपारपर्यंत विरोधी महाआघाडीच्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने संघाची १७ जागांसाठी १८ फेब्रुवारीला होणारी निवडणुक बिनविरोध झाली आहे.
त्यामुळे संघावर पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले गटाची सत्ता आली आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत १७ जागांसाठी ५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीत सर्व अर्ज मंजूर करण्यात आले. दाखल अर्ज माघारीची मुदत सोमवारी (दि.५) दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या मुदतीत अनेकांनी माघार घेतल्याने १७ जागांसाठी १७ अर्ज राहिल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली.
बिनविरोध झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे
सहकारी संस्था प्रतिनिधी मतदार संघ (जागा १०)
दत्तात्रय बबनराव नारळे, अशोक दशरथ कामठे, अजिंक्य वाल्मिक नागवडे, संजय अप्पासाहेब धामणे, भारत गोपीनाथ फालके, संजना विठ्ठल पठारे, डॉ. राजेंद्र सूर्यभान ससे, आसाराम दशरथ वारुळे, मंगेश ठकाजी बेरड, बाबासाहेब सदाशिव काळे.
व्यक्तिगत मतदार संघ (जागा २)
रावसाहेब मारुती शेळके, मिनीनाथ एकनाथ दुसुंगे.
महिला राखीव मतदार संघ (जागा २)
मंगल लक्ष्मण ठोकळ, मीना बाळासाहेब गुंड.
इतर मागास प्रवर्ग (जागा १)- उत्कर्ष बाळासाहेब कर्डिले.
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग (जागा १)- जीवन भाऊसाहेब कांबळे.
वि.जा.भ.ज. प्रवर्ग (जागा १) – संतोष अर्जुन पालवे.
बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, खासदार सुजय विखे, युवा नेते अक्षय कर्डीले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, सभापती भाऊसाहेब बोठे, माजी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती रभाजी सूळ, संचालक संतोष म्हस्के आदींनी अभिनंदन केले.