spot_img
अहमदनगरAhmednagar News : मोटारसायकल चोरणारे तिघे जेरबंद, सात दुचाकींसह सहा लाखांचा मुद्देमाल...

Ahmednagar News : मोटारसायकल चोरणारे तिघे जेरबंद, सात दुचाकींसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : मोटारसायकल चोरणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. राहुल विजय निकम (वय २४, रा.विळदघाट), बंडू सुदाम बड़े (वय २९, रा.देहरे), अरुण बाळासाहेब धिरोडे (वय २५, रा.बेलापूर) अशी ताब्यात घेतलेल्या तिनी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सात चोरीच्या दुचाकींसह ६ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

अहमदनगर जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मोटार सायकल चोरी करणार्‍या आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव,

पोहेकॉ मनोहर गोसावी, संदीप पवार, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे आदींचे पथक नेमून करावी करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, राहुल निकम हा साथीदारांसह देहरे येथून विळदघाट बायपास येथे चोरी केलेली मोटार सायकल विक्री करण्यास येणार आहे.

पोलिसांनी सापळा लावून राहुल व बंडू या आरोपीना ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता अरुण बाळासाहेब धिरोडे (वय २५, रा. बेलापूर) यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, एमआयडीसी, निंबळक, पुणे आदी ठिकाणावरून मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. पथकास दोन्ही आरोपींकडे विविध कंपनीच्या ६ मोटार सायकल व आरोपी अरुण धिरोडे याकडे चोरीची एक मोटार सायकल ताब्यात घेतली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...