spot_img
अहमदनगरAhmednagar News : शेतकऱ्यांचे पीक कर्ज शासनाने भरावे, आ. लंके यांनी लक्षवेधीमध्ये...

Ahmednagar News : शेतकऱ्यांचे पीक कर्ज शासनाने भरावे, आ. लंके यांनी लक्षवेधीमध्ये केल्या ‘या’ मागण्या

spot_img

पारनेर /नगर सह्याद्री :
पारनेर व नगर तालुक्यातील ४९ गावातील शेतकऱ्यांना १५ दिवस उलटूनही एक रुपयाची मदत सरकारच्या वतीने दिली नसल्याची लक्षवेधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी विधानसभेत मांडली.

त्यामुळे पारनेर व नगर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, राज्यातील अनेक भागात गारपिटीने, अवकाळीने मोठे नुकसान झाले असून त्यांनाही मदत द्यावी अशी मागणी आ. लंके यांनी केली. तसेच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज शासनाने भरावे अशी मागणीही त्यांनी केली.

सन २०२३-२४ च्या पुरवणी मागण्यासंदर्भात लक्षवेधी मध्ये आमदार निलेश लंके म्हणाले की राज्यामध्ये २५ ते २७ नोव्हेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी व गारपीट झाली. पारनेर व नगर तालुक्यातील जवळपास ४९ गावे बाधित झालेले आहे. या गारपिटीमुळे कांदा, केळी, पपई, द्राक्ष, मोसंबी, संत्री, गहू, हरभरा, मका आदींसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

त्यामुळे या ४९ गावातील बळीराजा अक्षरशः उध्वस्त झाला आहे. या ४९ गावातील बाधित शेतकऱ्यांची संख्या १० हजार ४५२ असून या गारपिटीने अवकाळी सहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. त्यामुळे या बाधित क्षेत्रांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी लक्षवेधी दरम्यान केली आहे.

महसूलमध्ये कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी
महसूल विभागातील कर्मचारी संख्येंकडे त्यांनी लक्ष वेधले. एका कामगार तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा पदभार आहे. त्यांना काम करण्यात मोठी अडचण येत आहे. त्यामुळे या रिक्त जागांवर कर्मचाऱ्यांची भरती करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आ. लंके यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...

खा. नीलेश लंके यांना भाजपची ‘मोलाची साथ’; राणीताई लंके यांचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार

पारनेरला राज्य शासनाचा कोट्यवधींचा निधी | आ. टिळेकर धावले मदतीला | राणीताई लंके यांचा...