spot_img
अहमदनगरAhmednagar News : अबब ! लाखोंच्या मुद्देमालासह 'तो' अट्टल चोर जेरबंद, नगर...

Ahmednagar News : अबब ! लाखोंच्या मुद्देमालासह ‘तो’ अट्टल चोर जेरबंद, नगर पोलिसांनी थेट रायगडातून आवळल्या मुसक्या

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल मोबाईल चोर ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून दीड लाखांचे २ आयफोन व १ विवो कंपनीचा फोन जप्त केला आहे. ज्ञानेश्वर तुकाराम जाधव (वय ४३ वर्षे, रा. विणेगांव, जि. रायगड) असे आरोपीचे नाव आहे.   

अधिक माहिती अशी : शुभम कुंडलिक वाफारे (वय २२ वर्षे, रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली होती की, २५ जानेवारीस ट्रान्सपोर्टची गाडी घेऊन मुंबई येथे जात असताना त्यांचा कंटेनर केडगाव बायपास, अहमदनगर या ठिकाणी नादुरुस्त झाला होता. त्यावेळी चोरट्याने फिर्यादी व त्यांचे मित्राचे  २ अॅपल कंपनीचे फोन, व १ विवो कंपनीचा फोन चोरून नेला होता.

कोतवाली पोलिसांत या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ संदीप पवार, पोना/रविंद्र कर्डिले, भिमराज खर्स, पोकों/अमृत आढाव आदींचे   पथक तयार करुन पथकास आरोपीचा शोध घेण्याबात सूचना देऊन रवाना केले. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे  वरील आरोपीने चोरी केल्याचे समोर आले. पथकाने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी खालापूर, जि. रायगड येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...