spot_img
महाराष्ट्रAhmednagar: नगर जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या!! कोतवालीचे..

Ahmednagar: नगर जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या!! कोतवालीचे..

spot_img

४ पोलीस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या
अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील ४३ पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात ४ पोलीस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक तर १८ पोलीस उपनिरीक्षक आहेत.

या आदेशानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची शिर्डीत साई मंदिर सुरक्षा विभागातून शिर्डीच्या वाहतूक नियंत्रण शाखेत, सोपान काकड यांची राहाता पोलीस ठाण्यात, खगेंद्र टेंभेकर यांची शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात, सतीश घोटेकर यांची शिर्डीतील साई मंदिर सुरक्षेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांची मिरजगाव पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत, राजू लोखंडे यांची राहुरी पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखेत, महेश येसेकर यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातून शिर्डीतील वाहतूक नियंत्रण शाखेत, रवींद्र पिंगळे यांची कोतवाली पोलीस ठाण्यातून राहुरी पोलीस ठाण्यात, विश्वास भान्सी यांची कोतवाली पोलीस ठाण्यातून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात, नितीन रणदिवे यांची तोफखाना पोलीस ठाण्यातून पाथर्डी पोलीस ठाण्यात, विश्वास पावरा यांची तोफखाना पोलीस ठाण्यातून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात, प्रमोद वाघ यांची पारनेर पोलीस ठाण्यातून नेवासा पोलीस ठाण्यात, रामेश्वर कायंदे यांची पाथर्डी पोलीस ठाण्यातून शिर्डी पोलीस ठाण्यात, महेश जानकर यांची खर्डा पोलीस ठाण्यातून कोतवाली पोलीस ठाण्यात, प्रशांत कंडारे यांची शिर्डी पोलीस ठाण्यातून शेवगाव पोलीस ठाण्यात, संभाजी पाटील यांची शिर्डी पोलीस ठाण्यातून पारनेर पोलीस ठाण्यात, योगिता कोकाटे यांची शिर्डी पोलीस ठाण्यातून कोतवाली पोलीस ठाण्यात, प्रवीण दातरे यांची तात्पुर्ते नियंत्रण कक्षातून तोफखाना पोलीस ठाण्यात, कल्पेश दाभाडे यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून नगरच्या नियंत्रण कक्षात, रामचंद्र कर्पे यांची शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यातून, नगर शहर वाहतूक शाखेत, विजय झंजाड यांची श्रीगोंदा पोलीस ठाण्यातून खर्डा पोलीस ठाण्यात, प्रल्हाद गिते यांची नगर तालुका पोलीस ठाण्यात, प्रकाश पाटील यांची मिरजगाव पोलीस ठाण्यात, पप्पू कादरी यांची शिर्डी पोलीस ठाण्यात, विजय माळी यांची कर्जत पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

पोलीस उपनिरीक्षकांची बदली
पोलीस उप निरीक्षकांतील राजेंद्र इंगळे यांची कोतवाली पोलीस ठाण्यातून बीडीडीएसमध्ये, आश्विनी मोरे यांची कोतवाली पोलीस ठाण्यातून भरोसा सेलमध्ये, युवराज चव्हाण यांची नगर तालुका पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखेत, योगेश चाहेर यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यातून नगर शहर वाहतूक शाखेत, श्रीकांत डांगे यांची पाथर्डी पोलीस ठाण्यातून नगरच्या दहशतवाद विरोधी शाखेत, शैलेंद्र जावळे यांची पारनेर पोलीस ठाण्यातून नगरच्या नियंत्रण कक्षात, अनिल भारती यांची जामखेड पोलीस ठाण्यातून शिर्डीच्या वाहतूक नियंत्रण शाखेत, पोपट कटारे यांची राहुरी पोलीस ठाण्यातून नगरच्या नियंत्रण कक्षात, मनोज महाजन यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात, तुळशीराम पवार यांची सुपा पोलीस ठाण्यातून नगरच्या नियंत्रण कक्षात, अतुल बोरसे यांची श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात, भरत दाते यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातून पारनेर पोलीस ठाण्यात, समाधान भाटेवाल यांची कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातून नगरमधील स्थानिक गुन्हे शाखा, संतोष पगारे यांची शिर्डी पोलीस ठाण्यातून जामखेड पोलीस ठाण्यात, निकिता महाले यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून एमआयडीसी पोलीस ठाण्यात, मनोज मोंढे यांची नेवासा पोलीस ठाण्यातून एमआयडीसी पोलीस ठाण्यात, निवांत जाधव यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून नक्षल सेलमध्ये तर उमेश पतंगे यांची घारगाव पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...