spot_img
अहमदनगरAhmednagar: अफवांवर विश्वास ठेवू नका!! 'पारनेर पतसंस्था चळवळ सक्षमच'

Ahmednagar: अफवांवर विश्वास ठेवू नका!! ‘पारनेर पतसंस्था चळवळ सक्षमच’

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळीने महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु एखाद्या घटनेमुळे पतसंस्था चळवळीला बदनाम करण्याचे काम चालू असून पारनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळ सक्षम असल्याची ग्वाही साह्यक निबंधक गणेश औटी यांनी दिली आहे.

मंगळवार दि. २३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा सहकारी बँक पारनेर मा. गुलाबराव शेळके सभागृहात नागरी/ ग्रामीण सहकारी पतसंस्थांचे आदर्श उपविधी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे १६ जानेवारी २०२४ चे पत्रन्वये पतसंस्थामार्फत अभिप्राय मागवण्यात आलेले आहे या चर्चासत्रामध्ये पारनेर सहाय्यक निबंधक गणेश औटी बोलत होते.

राज्य फेडरेशनचे अध्यक्ष तथा आदर्श उपविधी दुरुस्ती समिती सदस्य काका कोयटे, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, सभापती काशिनाथ दाते सर, निघोज ग्रामीण पतसंस्था चेअरमन वसंत कवाद, सेनापती बापट पतसंस्था चेअरमन रामदास भोसले, पारनेर फेडरेशन अध्यक्ष शिवाजी मोरे, वसंतराव चेडे, तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे तर ऑनलाईन जिल्हा बँक संचालिका गीतांजलीताई शेळके, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना गणेश औटी म्हणाले, पारनेर तालुक्यातील पतसंस्था अतिशय सक्षम आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, एकाच वेळी सर्व ठेवीदारांनी पैशाची मागणी केल्यास कोणतेही संस्था किंवा राष्ट्रीयकृत बँक देखील ठेवी परत करू शकत नाही. एवढी जाणीव सर्व ठेवीदारांनी ठेवावी आणि पतसंस्थांना सहकार्य करावे. एखादा दुसरा अपवाद असू शकतो पारनेर तालुक्यातील स्थानिक राजकारण किंवा आपसी मतभेद असल्याकारणाने म्हणा विनाकारण द्वेष पसरून, अफवा पसरून, संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. या आफवांमुळे पतसंस्थांचे नुकसान होऊ नये, यासाठी संस्था चालकांनी एकमेकांशी चर्चा करून एकमेकांना आधार देण्यासाठी आजचा हा पतसंस्था आदर्श उपविधी मध्ये दुरुस्ती करणे संदर्भात चर्चासत्र आयोजित केले असल्याचे माहिती निबंधक औटी यांनी दिली.

यामध्ये मॅनेजर यांची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, सहकार क्षेत्रातील कमीत कमी दोन वर्षाचा मॅनेजर पदाचा अनुभव असावा, संस्था कर्मचारी यांना द्यावयाचे कर्ज तारणी असावी, स्वनिधीच्या २० टक्के असावे, ज्या संस्थांच्या कर्मचारी वर्गात निबंधकाने मंजूर केलेल्या सेवा नियमानुसार कर्ज व्याजदर ठेवावा, संस्थेचे सर्व कामकाज संगणीकृत असावे, ठेवीच्या प्रमाणात कार्यालय भाडे असावी, एकूण ठेवीच्या प्रमाणात कर्मचारी वेतन असावे, शासन परिपत्रकानुसार ३१/०३ अखेर १००% एनपीए तरतूद करणे आवश्यक राहील, शासन परिपत्रकानुसार ३१/०३ अखेर १०० टक्के थकव्यात तरतूद करणे आवश्यक राहील व तो व्यवहार दुबेरची असेल, सीआरएआर शासनाच्या शासन परिपत्रकानुसार ३१/०३ अखेर प्रमाण ९% पेक्षा जास्त राहील, नियमक मंडळ यांनी वेळोवेळी केलेले बदल संस्थेस मान्य राहील अशी प्रस्तावित दुरुस्त्यांची मागणी केलेल्या आहेत.

यावेळी या कार्यशाळेत करण्यात आलेले ठराव करण्यात आले असून यामध्ये वैधानिक गुंतवणूक रोख तरळता प्रमाण (सीआरआर) प्रणालीतून कर्ज वाटप करणे कर्मचारी सेवा नियम लागू करणे राज्य / तालुका फेडरेशनचे सभासदत्व स्थैर्य निधी देणे यांचा सामावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता हांडे यांनी केले यावेळी पारनेर तालुक्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, संचालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

एकही संस्था अडचणीत येणार नाही
पारनेर तालुक्यातील ८६ पतसंस्थांचा वैधानिक तरलता निधी (एसएलआर) च्या माध्यमातून १४२५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. पारनेर तालुक्यातील पतसंस्थांची गुंतवणूक तब्बल ५५३ कोटी रुपयांची आहे. म्हणजे शासननाच्या नियमानुसार संस्थांचा एसएलआर २५% राखण्याची मर्यादा असते, परंतु पारनेर तालुक्यातील तरलता ३८.८०% आहे. याचा अर्थ पारनेर तालुक्यातील पतसंस्था किती सक्षम आहे हे दिसते याला आपण प्रसिद्धी दिली पाहिजे. परिस्थिती खूप सक्षम आहे अफवा पसरू नका, जिल्ह्यातील एकूण पतसंस्थांच्या ठेवीपैकी १४.०२ टक्के ठेवी एकट्या पारनेर तालुक्यातील आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नाही. एकही संस्था अडचणीत येणार नाही याची जबाबदारी राज्य फेडरेशन घेत असल्याची ग्वाही देतो.
काका कोयटे (अध्यक्ष, राज्य फेडरेशन सहकारी संस्था)

पतसंस्था सक्षम
ऑनलाईन वरुन जी एस महानगर व जिल्हा बँकेत पारनेरच्या पतसंस्थेच्या बर्‍याच ठेवी आहेत. पारनेरच्या पतसंस्था अतिशय सक्षम आहेत. पतसंस्था ह्या ग्रामीण लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी फार मदतगार आहेत. ठेवीदारांनी कष्टाचे पैसे आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या बँकेत अथवा पतसंस्थेत ठेवलेले असतात त्याची जबाबदारी आपण सर्वांनी पाळली पाहिजे.
गीतांजली शेळके (संचालक, जिल्हा बँक)

सहकार चळवळ काळाची गरज
ऑनलाईन वरुन पारनेर तालुका सहकाराचा उगम आहे. राज्यात आपली एक ओळख आहे. सहकार चळवळ टिकणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हा बँकेचा प्रतिनिधी म्हणून एक ग्वाही देतो आपली जिल्हा बँकेची डायरेक्टर बॉडीची मीटिंग करून ज्या संस्थांचे बॅलन्स शीट चांगले आहे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार. यावेळी दाते सरांनी गायकवाड यांना सुचवले की बँकेच्या पुढील मीटिंगमध्ये ज्या संस्था अडचणीत आहेत त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यास संचालक गायकवाड यांनी प्रतिसाद दिला.
प्रशांत गायकवाड (संचालक, जिल्हा बँक)

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...