spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : कारखाली चिरडून आईसह मुलाला ठार मारले, पारनेर तालुक्यात खळबळ

Ahmednagar Breaking : कारखाली चिरडून आईसह मुलाला ठार मारले, पारनेर तालुक्यात खळबळ

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री : अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कारखाली चिरडून आईसह मुलाला ठार मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना पारनेर शहरात घडली आहे.

शीतल अजित येणारे (२७), स्वराज येणारे (वय अडीच वर्षे) अशी मृतांची नावे असून किरण राजाराम श्रीमंदिलकर असे आरोपींची नावे आहेत. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.

मृत महिलेची सासू चंद्रकला शिवाजी येणारे हिने पोलिसात धाव घेत किरण राजाराम श्रीमंदिलकर याच्या विरोधात फिर्याद दिली. आरोपी सध्या फरार झाला आहे. अधिक माहिती अशी : फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, श्रीमंदिलकर व येणारे कुटुंब शेजारी शेजारी राहत असून घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात भांडणारे होत होती.

किरण श्रीमंदिलकर हा येणारे कुटुंबाला नेहमी जिवे मारण्याची धमकी देत होता. दरम्यान गुरुवारी सायंकाळी शीतल आपला अडीच वर्षांचा मुलगा स्वराजला जेवण भरवत बाहेर घरासमोर बसल्या होत्या. त्याच वेळी आरोपी आपल्या कार ने तेथे आला.

त्याने शीतल व स्वराज यांच्या अंगावर कार घातली. आवाज ऐकून शीतलच्या सासू चंद्रकला घराबाहेर आल्या. त्यांना समोर शीतल व स्वराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. आरडाओरड ऐकून परिसरातील लोकांनी तिकडे धाव घेत जखमी शीतल व स्वराज यांना गाडीखालून बाहेर काढले.

तेथील डॉक्टरांनी परिस्थिती पाहता उपचारासाठी नगरला हलवण्याचा सल्ला दिला. शीतलला नगर येथील शासकीय रुग्णालयात तर स्वराजला विळद घाटातील विखे पाटील रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान शीतलचा गुरुवारी रात्री ९ वाजता, तर स्वराजचा मध्यरात्री एक वाजता मृत्यू झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पिकअप-रिक्षाचा भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी…

जामखेड / नगर सह्याद्री जामखेड करमाळा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने पाडळी फाट्यावर असलेल्या...

Politics News: नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपानेच आखला डाव? ठाकरे गटाच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई। नगर सहयाद्री- शिनसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोठा दावा करण्यात आला आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर...

‘सिंघम अगेन’ मधील अजय देवगणचा ‘फर्स्ट लूक’ समोर

नगर सहयाद्री टीम- बॉलीवुड अभिनेता अजय देवगणचं नाव घेतलं की त्याची ‘सिंघम’ व्यक्तिरेखा डोळ्यासमोर आल्याशिवाय...

सुखी संसारात पडलं विरजण! बावीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पण क्षणात होत्याच नव्हतं झालं..

जामखेड । नगर सहयाद्री मोठ्या थाटामाटात विवाह पार पडल्यानंतर नव दाम्पत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत...