spot_img
राजकारणआदित्य ठाकरेंनंतर ठाकरे परिवारातील दुसरी व्यक्ती निवडणूक लढवणार ! शर्मिला राज ठाकरे...

आदित्य ठाकरेंनंतर ठाकरे परिवारातील दुसरी व्यक्ती निवडणूक लढवणार ! शर्मिला राज ठाकरे या लोकसभेला उतरणार

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम निवडणूक लढवली. तो पर्यंत ठाकरे घरातील कुणीही निवडणूक लढवली नव्हती. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे लोकसभेच्या रिंगणात उत्तरीतलं अशी चर्चा सध्या सुरु आहे.

शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने चर्चा रंगली आहे. दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल, असं सूचक वक्तव्य पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं. त्यामुळे शर्मिला ठाकरे या लोकसाभेला उभ्या राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील साईनाथ बाबर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोंढवा गावातील प्रथम महिला नगरसेविका पत्नी आरती साईनाथ बाबर यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने खास महिलांसाठी “कोंढव्याची सौभाग्यवती 2024” कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास शर्मिला ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या.

याच कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना आता महापालिकेत पाहायचं नसून मोठ्या पदावर पाहायचं असल्याचे सांगितेल. त्यामुळे साईनाथ बाबर सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरणार का? अशीही चर्चा रंगली आहे. आम्ही निवडून येवो किंवा न येवो आमच्या पक्षातील कामे सुरू असतात, असेही त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता शेवटची वॉर्निंग! महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा धडाका, नेमकं प्रकरण काय? पहा..

अहमदनगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयातील अधिकारी...

‘आपला हक्काचा माणूस’ हीच माझी ओळख; नगर शहर विकसीत होतंय आणि बदलतंय याचे मोठे समाधान

‘आपला हक्काचा माणूस’ हीच माझी ओळख, हे समाधान फक्त माझ्या वाट्याला ः आ. जगताप माझे...

Ahmednagar Politics News: कर्डिले अन् पवार यांच्यात गुफ्तगू! राजकीय समिकरणे बदलण्याचे संकेत, श्रीगोंद्यातील जनतेकडून..

जिल्ह्याच्या राजकीय समिकरणात बदलाचे संकेत | श्रीगोंद्यातील जनतेकडून कर्डिलेंच्या संभाव्य उमेदवारीचे स्वागत सुनील चोभे |...

Rain update: ओढे, नाले खळखळून वाहिले! आता पुढील चार दिवसांत ‘या’ भागात भरभरून बरसणार

मृग सर्वदूर भरभरून बरसला। ओढे, नाले खळखळून वाहिले। पेरणीची लगबग सुरू अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर...