spot_img
अहमदनगरAhmednagar News : चुकीच्या संचमान्यतेमुळे अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन; ग्रामस्थ आक्रमक, शाळेला कुलुप...

Ahmednagar News : चुकीच्या संचमान्यतेमुळे अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन; ग्रामस्थ आक्रमक, शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा

spot_img

सुपा | नगर सह्याद्री –
Ahmednagar News : शिक्षण विभागाच्या चुकीच्या संचमान्यतेमुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याने भोयरे गांगर्डा (ता. पारनेर) येथील ग्रामस्थ, पालक व शालेय व्यवस्थापन समिती आक्रमक झाली आहे. शिक्षकाचे समायोजन (बदली) तात्काळ थांबवा अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा भोयरे गांगर्डा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे गांगर्डा येथील सन २०२२-२३ चा सरल पोर्टल नुसार ६१ होता. दोन विद्यार्थी ऑफलाईन होते. परंतु आधारमुळे ऑनलाईन पट ६० दाखवत होता. त्यामुळे एक शिक्षक अतिरिक्त होत आहे. तसेच सन २०२३-२४ चा पट ६४ असून सन २०२३-२४ घ्या संचमान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त होत नाही. एवढे असूनही एक शिक्षक अतिरिक्त ठरविला जात आहे. त्यामुळे पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. पाचवीचा पट १७ असून चार विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरतील, असे आहेत. चालू वर्षाच्या पटानुसार कोणताही बदल न करता पहिली ते पाचवीपर्यंत आहे तेच शिक्षक कायम करावेत. निवेदनाची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा पहिली ते सातवीचे सर्व वर्ग बंद ठेऊन शाळेला कुलुप ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर माजी सरपंच भाऊसाहेब विठ्ठल भोगाडे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड, माजी उपसरपंच दौलत गांगड, सुधीर पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज डोंगरे, उपाध्यक्ष रवींद्र भोगाडे, मधुकर लगड, शरद पवार, राजेंद्र रसाळ, शरद रसाळ, विजय कामठे, अनिकेत लगड आदींच्या सह्या आहेत.

एकीकडे गरिबांची शाळा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्येला घरघर लागली असताना ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा तग धरून आहेत. येथे मुलांना शिक्षणही चांगल्या गुणवत्तेचे मिळते. ग्रामीण भागात रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे असंख्य कुटुंब आहेत. ते आपल्या मुलाला खासगी शाळेत पाठवू शकत नाहीत. पट संख्येनुसार आहे त्याच ठिकाणी शिक्षक ठेवावा, अन्यथा याचे परिणाम शिक्षण विभागाला भोगावे लागतील.
– संजय पवार, पालक भोयरे गांगर्डा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुन्हा नगर हादरले? मध्यरात्री मित्राच्या घरी गेला, धारदार शस्राने खून केला

अहमदनगर। नगर सहयाद्री- जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मित्राने धारदार शस्राने...

आजचे राशी भविष्य! लक्ष्मी मातेच्या कृपेने ‘या’ राशींना होणार मोठा लाभ

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य...

धक्कादायक! मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी असा अडकला जाळ्यात…

अहमदनगर / नगर सह्याद्री मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून...

Politics News: आमदार राम शिंदे यांनी सांगितले खा. सुजय विखे यांचा विजयाचे गणित! ‘इतक्या’ लाखांचे मताधिक्यक मिळणार, पहा..

अहमदनगर | नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या, तथाकथित सर्व्हेही झाले होती....