spot_img
अहमदनगरआमचं ठरलं! सुजित झावरे पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात कार्यकर्त्यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

आमचं ठरलं! सुजित झावरे पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात कार्यकर्त्यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री
पाटील तुम्ही पुढे चला हे सैन्य तुमच्या मागे उभे आहे, तुम्हीच आमचा पक्ष आहात, धीर सोडु नका या तालुक्यात परिवर्तन घडवायचे असून २०२४ ची विधानसभा आपण लढवायचीच असे सांगत कार्यकर्त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात विधानसभेचे रणशिंग फुंकले.

शनिवार दि २३ मार्च रोजी पारनेर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सुजित झावरे पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा व कार्यकर्त्यांना मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार सुजय विखे यांनी सुद्धा उपस्थिती लावली. तसेच कार्यक्रमासाठी तालुक्यातील स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे यांच्यावर प्रेम करणारे व सुजित पाटील यांना मानणारे सर्व स्तरातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आम्ही कायमच सुजित पाटलांना साथ देत आलोय आणि यापूढे देणार आहोत, पण सध्याच्या राजकारणात तड‌जोड करावी लागते. दादांच्या काळात राजकारण वेगळे होते. सध्या तालुका चुकीच्या दिशेने चालला आहे. विकासकामांना सुजय विखे अग्रेसर आहेत, त्यांचे गल्लीपासुन दिल्लीपर्यंत चांगले वजन आहे. तालुक्याला भरीव निधी दिला त्यामुळे सुजित पाटीलांनी विखें साहेबांबरोबर जावे. तालुक्यात परिवर्तनाची गरज असून येणारी २०२४ ची विधानसभा आपण लढवायची असे म्हणत कार्यकर्त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात विधानसभेचे रणशिंग फुंकले.

सुजित झावरे पाटलांवर जबाबदारी देणार
झावरे पाटलांवर प्रेम करणारी सगळी मंडळी आज उपस्थित आहेत. सुजित पाटलांवर दोन प्रकारचे प्रेम करणारे आहेत. एक मनातून आणि दोन कामापुरते प्रेम करणारे. मी मनापासुन प्रेम करणाऱ्यामध्ये आहे. माझ्या बरोबर राहण्याची जी भूमिका मांडली याबददल आभार मांडतो. राष्ट्रीय वयोश्री योजनेचे काम फक्त तालुक्यात सुजित पाटलांमुळे झाले. समोर उमेदवार फायनल होईपर्यंत राजकीय भाष्य करणार नाही. सुशिक्षीत तरुणाना विचारा कोणासारखे होयचे. तो सांगेन त्याला मतदान करा. सुजित झावरेंसारखा मित्र मिळाला हेच माझ भाग्य आहे. संघर्षात सुद्धा पाटील उभे आहेत यांचा मला आभिमान आहे. त्यांना जो त्रास झाला. तो त्रास सहन करून सुद्धा कार्यकर्ते त्यांनी संभाळले आहे. तुमचे केस पाढरे होयच्या आत तुमच्यावर जबाबदारी देयची आहे.
– खासदार सुजय विखे पाटील

माझ्या जे मनात तेच ओठात! 
राज्यात दुष्काळ पड‌ला असताना राज्यातील पहिली छावणी स्व बाळासाहेब विखे यांनी सुरु केली होती. स्व बाळासाहेब विखे, स्व वसंतराव दादा, वळसे पाटील यांची बैठक झाली त्यानतंर शालीनीताई अध्यक्ष, आणि मी उपाध्यक्ष झालो. माझ्या जे मनात आहेत तेच ओठात आहे, खासदार सुजय विखे हे सृजनशील नेते आहेत. ३५०० लोकांना जो तालुक्यात लाभ मिळाला तो सुजयदांदामुळेच मिळाला आहे. निवडणुक आली त्यामुळे हा कार्यक्रम ठेवलेला नाही, घरंदाज माणूस हा घरदाज माणसाच्या मागे असतो. घराला राखण माणुस कसा ठेवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे.
– सुजित झावरे पाटील ( माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद )

यावेळी पंकज कारखिले, इंद्रभान गाडेकर, संदीप कपाळे निजाम पटेल, बाळासाहेब माळी, अरुण ठाणगे, विलास काळे, अमोल मैड, संतोष शेलार, रणजित पाटील, सुरेश पठारे, रामा गाडेकर, कैलास कोठावळे, योगेश रोकडे, युवराज पठारे, संग्राम पावडे, माऊली वरखडे, सुभाष करंजुले, अशोक मेसे, अमोल रासकर, रवींद्र पडळकर, तसेच तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी देवकृपा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम पार पाडला. यावेळी प्रस्ताविक प्रसाद झावरे यांनी केले तर जयसिंग गुंजाळ यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...