spot_img
ब्रेकिंग’दै नगर सह्याद्री’ इफेक्ट! 'या' कारखान्यावर कारवाई होणार? तपासणी सुरु, नेमकं प्रकरण...

’दै नगर सह्याद्री’ इफेक्ट! ‘या’ कारखान्यावर कारवाई होणार? तपासणी सुरु, नेमकं प्रकरण काय?

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
येथील हिरडगाव फाटा परिसरातील गौरी शुगर साखर कारखान्याच्या सांडपाण्यामुळे सजीवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कडे वनविभाग, कारखाना प्रशासन, पर्यावरण नियंत्रण महामंडळ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्क रत आहे का? असा सवाल ’दैनिक नगर सह्याद्री’ या वृत्त पत्राच्या माध्यमातुन करण्यात आला होता. त्याचाच धसका घेत प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांनी पाझर तलावातील सांडपाण्याची पाण्याची पाहणी करून नमुने तपासणीसाठी घेतले असून याबाबतचा अहवाल मुबई कार्यालयाला पाठविणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण चे क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे यांनी सांगितले आहे.

गौरी शुगर कारखान्याने मळी युक्त पाणी कारखान्याच्या शेजारील पाझर तलावात सोडल्याने तलावसह परिसरातील विहिरी बोअरवेल यांचे पाणी दूषित झाल्याने उन्हाळ्यात जनावरांसह माणसांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यालगत असलेल्या जंगलातील वन्य प्राण्यांचे जीव आणि आरोग्य धोक्यात आले असून याकडे वनविभाग, कारखाना प्रशासन, पर्यावरण नियंत्रण महामंडळ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल दि ३ मार्च रोजी ’दैनिक नगर सह्याद्री’ वृत्त पत्रामध्ये प्रसिद्ध होताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले. पर्यावरण नियंत्रण महामंडळाचे अमित लाटे (क्षेत्रीय अधिकारी) यांनी तत्काळ हिरडगाव कारखाना कार्यस्थळावर येऊन कारखान्याची पाहणी करून महाराष्ट्र शासनाच्या पाझर तलावात सोडलेल्या दूषित रसायन मळी मिश्रीत सांडपाण्याचे नमुने घेऊन शेतकर्‍याच्या शेतातील विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून कारखान्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगीतले.

कारखान्यामुळे संसार उद्ध्वस्थ
कारखाना सुरु झाल्यापासून आमचे प्रपंच उद्धवस्थ झाले. येथील सरकारी पाझर तलावामध्ये कारखान्याचे रसायन मिश्रित मळी सोडल्यामुळे संपूर्ण परिसरातील विहीर बोअर यासह सर्वच पाण्याचे उद्भभव दूषित झाले आहेत. त्यामुळे जनावरे पशु पक्षी यासह मानवाच्या जीवितास धोका निर्माण झालं आहे. तसेच पिके फळबागा जळून खाक होत असल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्थ होत आहेत. तरी याकडे प्रशासनाने लक्ष घालून सदरचा कारखाना बंद करावा. -शेतकरी खंडू जाधव

वेळकाढूपणा अधिकार्‍यांचा अंगलट येणार
गौरी शुगर(साईकृपा) कारखान्याला १ डिसेंबर २३ रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी भेट दिली. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०२४ ला कारखान्याला नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये कारखान्याने रसायन मळीमिश्रीत सांडपाणी हे तलावात सोडू नये अन्यथा १५ दिवसात कायदेशीर कारवाई होईल असे म्हंटले होते मात्र सुमारे ४ महिने उलटून गेले तरीही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे त्याचा वेळकाढूपणा अधिकार्‍यावर अंगलट येण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

अहमदनगर | नगर सह्याद्री उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात...

पदाधिकारी नॉट रिचेबल? पारनेरची सेनापती बापट पतसंस्था व्हेंटीलेटरवर!

ठेवीदारांच्या रांगा | हवालदिल ठेवीदारांची केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार | पदाधिकारी नॉट रिचेबल पारनेर |...

अमेरिकेतही डॉ. दीपक यांच्या संशोधनाला सन्मानाचा ‘दीप’

अहमदनगर | नगर सह्याद्री अमेरिकेतील व इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्यावतीने श्वसन प्रणालीमध्ये...

…म्हणून नगरमध्ये विजय महायुतीचाच होणार! खासदर विखे पाटलांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

श्रीगोंदा | नगर सह्याद्री अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार...