spot_img
अहमदनगरब्रेकिंग : नगर पुणे महामार्गावर अपघात!! खचाखच भरलेल्या बसमधले 'इतके' प्रवासी जखमी

ब्रेकिंग : नगर पुणे महामार्गावर अपघात!! खचाखच भरलेल्या बसमधले ‘इतके’ प्रवासी जखमी

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
अहमदनगर पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथे लझरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी : गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास अहमदनगर पुणे महामार्गावर पारनेर तालुयातील म्हसणे फाटा येथील कैलास गाडीलकर यांच्या पेट्रोल पंपासमोर ट्रक (एम एच -१६ सीडी ९५५०) महामार्ग ओलांडून पुण्याच्या दिशेने जात असताना त्याच वेळी पुण्याच्या दिशेकडून अहमदनगरच्या दिशेने जात असलेली चिंतामणी ट्रॅव्हल कंपनीची खासगी बस (क्रमांक एम एच २९ बीई ००९९) ही बस त्या ट्रकवर जोरात आदळली.

या अपघातात बस चालकासह १५ प्रवासी जखमी झाले आहेत. यात बसचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. इतर जखमींना सुपा, अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरुण अव्हाड फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. यावेळी पीआय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार इगळे, रमेश शिंदे, रुग्णवाहिका चालक सादिकभाई यांनी सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...