spot_img
अहमदनगर'आप' - भाजपचे कार्यकर्ते नगरमध्ये भिडले ! समोरासमोर घोषणाबाजी, काही काळ तणाव...

‘आप’ – भाजपचे कार्यकर्ते नगरमध्ये भिडले ! समोरासमोर घोषणाबाजी, काही काळ तणाव व पोलिसांकडून धरपकड

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. विविध ठिकाणी या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. नगर शहरामध्येही या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

परंतु भाजपच्या कार्यलयासमोर आल्यानंतर भाजपविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे भाजप कार्यकर्ते व आप कार्यकर्त्यात समोरासमोर घोषणाबाजी झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

अधिक माहिती अशी : मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपच्या कार्यकत्यांनी नगर शहरातील भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान घोषणाबाजी सुरु असताना नंतर भाजप कार्यालयात उपस्थित असलेले शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सचिन पारखी, महेश नामदे, वसंत लोढा, रामदास आधळे, मयूर बोचुघुळ, प्रशांत मुथा आदींसह अन्य पदाधिकारी कार्यालयातून खाली आले.

त्यांनी देखील मोदी सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. दोन्हीही पार्टीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...