spot_img
अहमदनगरहिवरे बाजारच्या डोंगराला भीषण आग, ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे मोठा अनर्थ टळला

हिवरे बाजारच्या डोंगराला भीषण आग, ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे मोठा अनर्थ टळला

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : आदर्शगाव हिवरेबाजार येथील चाणकाईमाता मंदिराजवळील डोंगराला भीषण आग लागली. ही घटना बुधवारी (२० मार्च) रात्री १० वाजता घडली. परंतु ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे ही आग त्वरित आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

बुधवारी रात्री चाणकाईमाता मंदिराजवळील डोंगराला आग लागली. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजारमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित आहे. त्यामुळे काही मिनिटातच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व तरुण मंडळ तसेच ग्रामवन समितीचे सदस्य घटनास्थळी आले.

त्यांच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आली व मोठा अनर्थ टळला. रात्री आग लागण्याची ही दुसरी वेळ असून यापूर्वी दिनांक ७ मार्च २०२४ रोजी देखील रात्रीच आग लागली होती. आगीत मोर, हरणे, ससे, लांडगे व इतर वन्यजीव आपला जीव वाचविण्यासाठी धावत होते. त्यावेळीद देखील काही वेळातच आग आटोक्यात आणली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुजय विखेेंचे नरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपिस्थितीत केला अर्ज दाखल, कोण कोण होते उपस्थित पहा

अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील...

पारनेर तालुका जैन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेश भंडारी, उपाध्यक्ष पदी प्रसाद कर्नावट

जैन महासंघाची तालुका कार्यकारणी घोषित पारनेर / नगर सह्याद्री - तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील...

भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये भव्य शोभायात्रा

त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की असा जयघोष / आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींच्या...

Sharad Pawar : शिंदे गटाच्या आमदाराचा शरद पवारांवर गंभीर आरोप, लायकीच काढली…

सातारा / नगर सह्याद्री - Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीसाठी राजकारण चांगलेच तापले आहे. टोकाचे...