spot_img
अहमदनगरश्रीगोंद्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; पडद्याआड नेमकं शिजतंय काय?

श्रीगोंद्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; पडद्याआड नेमकं शिजतंय काय?

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –

श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक दशके राजकारणात वर्चस्व असलेले नागवडे परिवारातील राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला.

पुण्यामधील बालेवाडी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले नागवडे दांपत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचं स्वागत अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी गळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळाचा पंचा टाकत आणि पुष्पगुच्छ देत केले.

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र नागवडे आणि जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे दाम्पत्य काँग्रेस पक्षावर काहीसे नाराज होते. गेल्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने आणि समर्थक कार्यकर्त्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असा मोठा आग्रह झाल्यानंतर नागवडे दाम्पत्यांने कोणताही परिस्थितीमध्ये 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केला होता. दरम्यान गेल्याच महिन्यामध्ये दिवंगत शिवाजीबापू नागवडे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हजेरी ही सूचक मानली जात होती. त्यानंतर मधल्या काळामध्ये अनेकदा मुंबईमध्ये नागवडे दाम्पत्यांने अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचा प्रवेश हा निश्चित झालेला होता. दरम्यान जयंती सोहळ्यातच त्यांनी काँग्रेस पक्षाचे राजीनामे देत लवकरच राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे घोषित केले होते. त्याच आज रविवारी पुण्यामध्ये बालेवाडी मध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्यामध्ये राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी पक्षप्रवेश केला आहे. नागवडे यांच्या पक्षप्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून लोकसभेनंतर होणारी विधानसभा निवडणुकी लक्षवेधी अशीच असणार आहे. सध्या ह्या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार बबनराव पाचपुते विद्यमान आमदार असताना त्याचबरोबर शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप पूर्ण तयारीत असताना आता नागवडे दाम्पत्याने राष्ट्रवादी पक्षातून आपल्या उमेदवारीची दावेदारी दाखल केलेली आहे. त्यामुळेच श्रीगोंदाचे राजकारण आता मोठे लक्षवेधी होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लेटफी दंड वसुली रद्द करण्यासाठी केंद्रकडे पाठपुरावा करणार: आ.जगताप

ऑटो संघटना फेडरेशनच्यावतीने आ.जगताप यांचा सत्कार अहमदनगर | नगर सह्याद्री:- रिक्षा फिटनेस, पासिंगबाबींसाठी लेटफी ही दर...

आरक्षणाबाबत शरद पवारांना जाब विचारावा? मंत्री विखे पाटलांचा जरांगे पाटलांना सवाल

अकोले | नगर सह्याद्री:- मराठा आरक्षणासाठी लढा देणार्‍या मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित...

पावसाचा हाहाकार! घरे, रस्ता पाण्याखाली, मुख्यमंत्र्यानी प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

पुणे | नगर सह्याद्री:- पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. बुधवारी रात्रपासून...

धक्कादायक! नऊ तोळे सोने बँकेतुन सोडले, पुढे नको तेच घडले..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- एसबीआय बँकेत गहाण ठेवलेले नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने सोडून आणल्यानंतर ते...