spot_img
अहमदनगरAvtar Meherbaba : अवतार मेहेरबाबांच्या समाधी स्थळी ६० हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन

Avtar Meherbaba : अवतार मेहेरबाबांच्या समाधी स्थळी ६० हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री –
Avtar Meherbaba : ‘बिगिन दि बिगिन’ ही धून पावणे बारा वाजता वाजली, नगर सेंटरच्या सदस्यांनी मेहेरधून म्हटली आणि लाखो मेहेर प्रेमींनी मौन व्रत अंगिकारले.

दुपारी १२ वाजता मौनास सुरुवात झाली. यावेळी सर्वत्र शांतता पसरली. १५ मिनिटांनंतर ‘अवतार मेहेर बाबा की जय’च्या जयघोषात मौन सोडण्यात आले. यावेळी टेकडीवर ६० हजारांवर भाविक होते. अवतार मेहेरबाबांच्या समाधी स्थळी ५५ वी अमर तिथी सोहळा होत आहे. ३१ जानेवारीला मेहेरबाबांनी देहत्याग केला. दुपारी १२ वाजता दौंड रोडवरील मेहराबाद (अरणगाव) येथे सुमारे ६० हजार भाविकांनी मौन पाळले. जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले.

मंगळवारपासून सुरु झालेल्या अमरतिथी सोहळ्यासाठी हजारो भाविक बसतील असा भव्य मंडप टाकण्यात आला. अवतार मेहेरबाबांनी मौनास सुरवात केल्यावर शेवटपर्यंत मौन पाळले म्हणून आजही महामौन पाळले जाते.सकाळी भजनास सुरवात झाल्यानंतर मेहेरधून म्हटली गेली. त्यानंतर मुख्य मंडपात कार्यक्रम सुरु झाले. बुधवारीही समाधीचे दर्शन घेण्यास मोठ्या रांगा लागल्या होत्या. भारतातून सुमारे लाखांवर मेहेरप्रेमी मेहेराबादकडे येत आहेत. कोठेही गडबड, गोंधळ नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभर चालू होते. त्यात मेहेर प्रेमींनी भजने, गजल, नृत्ये, कव्वाली, गाणे, नाटिका सादर केल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; कारणही सांगितलं

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी...

आरोपी रिक्षाने आले, वाट पहिली अन् थेट फायरिंग;…वाचा नेमकं काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री...

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे...