spot_img
ब्रेकिंगमहाविकास आघाडीला धक्का! वंचितच्या उमेदवारांची यादी जाहीर, पहा एका क्लिकवर..

महाविकास आघाडीला धक्का! वंचितच्या उमेदवारांची यादी जाहीर, पहा एका क्लिकवर..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. तसंच पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांसाठी आंबेडकर यांनी वंचितच्या उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. आम्ही जे मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांना महाविकास आघाडीने प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीची माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काल आमची सविस्तर चर्चा झाली. ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व दिलं जात नव्हतं, त्यांना प्रतिनिधित्व देण्याबाबतही बैठकीत आमची चर्चा झाली. तसंच मुस्लीम आणि जैन समाजालाही वाटा देण्याबाबत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांवरील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे. आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत असे ते म्हणाले.

वंचितची उमेदवार यादी
अकोला- प्रकाश आंबेडकर
चंद्रपूर – राजेश बेले
भंडारा गोंदिया – संजय केवट
गडचिरोली – हितेश मढावी
बुलढाणा – वसंत मगर
वर्धा – राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार
अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान
नागपुरातून काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा

 

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...