spot_img
अहमदनगरकोतवाली हद्दीतून चौघे हद्दपार ; 'यांच्यावर' झाली कारवाई

कोतवाली हद्दीतून चौघे हद्दपार ; ‘यांच्यावर’ झाली कारवाई

spot_img

कोतवाली हद्दीतून चौघे हद्दपार ; ‘यांच्यावर’ झाली कारवा
अहमदनगर / नगर सह्याद्री –
कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील चार गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीतुन हद्दपार करण्यात आले आहे. कोतवाली पोलिसांनी त्यांना पकडून हद्दीच्या बाहेर सोडले.

कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम यांना महा. पोलीस कायदा कलम 56(1) (अ) (ब) अन्वये अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करणेबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत उपविभागीय दंडाधिकारी साहेब, अहमदनगर यांना पाठविण्यात आले होते. यामध्ये सुनिल विठ्ठल शिरसाठ ( रा. बंगला नं. 9, पाच गोडावुन शेजारी, शाहुनगर रोड, केडगाव, अहमदनगर), क्षीतीज अरुन अबनावे (रा. निलकमल रौ हौसिंग सोसायटी, दत्त सायकल मार्ट जवळ, सारसनगर), अक्षय उर्फ भैरु बाबासाहेब कोतकर ( रा. देवी मंदीराजवळ, मोहीनीनगर, केडगाव), अक्षय बाबासाहेब दातरंगे (रा. दातरंगे मळा, गाडगीळ पटांगण) यांचे हद्दपार मंजुर झालेबाबतचे आदेश पोलीस स्टेशनला प्राप्त झाले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे आदेशान्वये चारही हद्दपार व्यक्तींना पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे स्थलसिमेच्या हद्दीबाहेर त्यांचे इच्छितस्थळी सोडणेकामी पोलीस अंमलदार यांचे सह रवाना केले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि रवींद्र पिंगळे, सपोनिरी. योगीता कोकाटे, पोउपनिरी सुखदेव दुर्गे, पो.हे.कॉ. तनवीर शेख, शाहीद शेख, मोहन भेटे, पो.ना. अविनाश वाकचौरे, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, सुजय हिवाळे, अमोल गाडे, राम हंडाळ, राहुल मासाळकर यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘दलित पॅंथरचा खासदार विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा’

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर...

लंके प्रतिष्ठानचा दावा सपशेल खोटा; भाळवणीतील कोवीड सेंटरवर सरकारचा खर्च कोट्यवधी!,

शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटरवर अंगणवाडी सेविका, झेडपीचा मास्तर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर...

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री...