अहमदनगर / नगर सह्याद्री
अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. तसेच आदेश सामान्य प्रशासन विभातून काढण्यात आले असून त्यांना बदली झाल्याच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्यास सांगितले आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेण्यापूर्वी आशिष येरेकर हे गडचिरोली जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते २०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ५ मे रोजी आशिष येरेकर यांची अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियक्ती झाली होती. येरेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले काम केले असल्याचे बोलले जात आहे.