World Malaria Day: सध्या डेंग्यू आणि मलेरियाची प्रकरणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात दिसून येताय. संपूर्ण जग अजूनही कोरोनाचे भयावह दृष्य विसरलेला नाही. तेवढ्यातच आणखी एका नवीन साथीचा धोका निर्माण झाला आहे. WHO ने या आजाराला X असे नाव दिले आहे जो कोरोना पेक्षा 7 पटीने जास्त धोकादायक आहे.
उद्या म्हणजेच 25 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण जगात मलेरिया दिन साजरा केला जातो. जगभरातील मलेरियाचे अनके प्रकार आहेत, मात्र यामधील कोणता प्रकार जास्त धोकादायक आहे. जाणून घेऊयात.
मलेरियाचे चार प्रकार?
1. प्लास्मोडियम वायवॅक्स
हा पेरासाईटचा प्रकार जगभरात आढळतो आणि भारतातही हा खूप प्रचलित आहे. भारतातील सुमारे 60% मलेरिया प्रकरणे P.v मुळे होतात. या प्रकारच्या मलेरियामध्ये हा आजार गंभीर असला तरी मृत्यू फार कमी प्रकरणांमध्ये होतो. अतिसार, थकवा आणि ताप ही त्याची लक्षणे आहेत.
2. प्लास्मोडियम ओव्हल
हा प्रकार प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणजेच पश्चिम आफ्रिकेत आढळतो. हा एक दुर्मिळ प्रकार आहे. हा फार दुर्मिळ आजार असून, हे डास चावल्यानंतर पेरसाईट मानवी शरीरात वर्षानुवर्षे राहू शकतो.
3. प्लास्मोडियम मलेरिया
हा प्रकार अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियातील उष्णकटिबंधीय ठिकाणी आढळतो. इतर प्रकारांप्रमाणे ते घातक मानले जात नाही. या मलेरियाची लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे आणि खूप ताप येणे अशी आहेत. जे उपचार घेऊन बरे होऊ शकतात.
4. प्लास्मोडियम फॅल्सीपेरम
– मलेरियामुळे होणारे बहुतेक मृत्यू या प्रकारामुळे होतात. हे प्रामुख्याने दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेत आढळते. लक्षणांमध्ये चक्कर येणे, स्नायू दुखणे, थकवा, पोटदुखी, पाठदुखी, शुद्ध हरपणे, मळमळ, उलट्या, ताप, डोकेदुखी आणि पक्षाघात इत्यादी गंभीर लक्षणे दिसू शकतात. यामुळे हा मलेरियाचा प्रकार अधिक धोकादायक मनाला जातो.