spot_img
ब्रेकिंगशिक्षणाचे माहेर घर का? जादू टोण्याची नगरी! 'असा' घडला 'धक्कादायक' प्रकार

शिक्षणाचे माहेर घर का? जादू टोण्याची नगरी! ‘असा’ घडला ‘धक्कादायक’ प्रकार

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-

शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. भोंदूबाबाने तरुणाला १८ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षणाच्या माहेर घरात जादू टोण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील हडपसर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणाची एका मित्रमार्फत भोंदूबाबा यांच्याची ओळख झाली. मांत्रिक आईरा शॉबने माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून भोंदूबाबाने तरुणाला आमिष दाखवले. पैशाचा पाऊस पडतो असे म्हणतं एक अघोरी पूजा करणार असल्याचे सागिंतले. ठरल्याप्रमाणे अघोरी पूजा सुरु झाली. पूजेसाठी तरुणाला १८ लाख रुपये ठेवण्यास सागितले.

पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतया पोलिस विराजमान झाले. तोतया पोलिसांनी भोंदूबाबासह तरुणाला मारहाण करत पूजेसाठी ठेवलेले १८ लाख रुपये पसार केले. हा सगळा डाव तरुणाच्या लक्षात त्याने पोलीस ठाणे गाठले. तरुणाच्या फिर्यादीवरून भोंदूबाबा आणि त्याच्या चार साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार पाचपुते यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार : विक्रमसिंह पाचपुते

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा ७० वा वाढदिवस...

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे....

“वाहनांची तोडफोड तर काही नागरीकांना इजा” आता ‘हा’ त्रास तातडीने थांबवा अन्यथा…; विवेक कोल्हे यांनी दिला इशारा, नेमकं प्रकरण काय?

कोपरगाव । नगर सहयाद्री:- शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. ऐन गणेश उत्सवाच्या काळात खरेदीसाठी...

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि...