spot_img
अहमदनगरयोजना पाण्याची नसून फक्त खाण्याची का? आक्रमक महिलांनी हंडा मोर्चा काढत दिला...

योजना पाण्याची नसून फक्त खाण्याची का? आक्रमक महिलांनी हंडा मोर्चा काढत दिला ‘असा’ इशारा

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील महिलांनी ग्रामपंचायती मार्फत पाणी मिळत नाही. या निषेधार्थ शुक्रवार दि. ३१ रोजी सकाळी ८ वाजता ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यात महिलांनी ग्रामपंचायत पदाधिर्यांविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत पाणी उपलब्ध न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भोयरे गांगर्डा गावासाठी पाडळी रांजणगाव येथील कॅनल जवळ खोदलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र कॅनलचे रोटेशन संपले की दोन ते तीन दिवसात विहीर कोरडी पडली होती. गेली अनेक दिवसांपासून विहीरीला पाणी नसल्यामुळे गावात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार ग्रामपंचायत पदाधिकार्यांना सांगूनही यात सुधारणा होत नसल्याने शनिवारी महिलांनी वृद्र रुप धारण केले.

आमच्याकडून घरपट्टी व पाणीपट्टी नियमित घेतली जाते मग पाणी देण्याची जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला. यावेळी शोभा भिंगारदिवे, मीना लोणारे, हिराबाई पाडळे, अलकाबाई पाडळे, वैशाली पाडळे, अनिता पाडळे, सविता पाडळे, रेखाबाई पाडळे, झुंबरबाई पाडळे, सरस्वती पाडळे, अविनाश भिंगारदिवे, संपत पाडळे, संजय पाडळे, देविदास पाडळे, विशाल पाडळे, गणेश गरदारे, प्रकाश भोगाडे, विलास गांगड, हरिष पाडळे, पांडुरंग लोणारे, लक्ष्मण कापरे आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योजना पाण्याची नसून फक्त खाण्याची का?
विसापूर ते भोयरे गांगर्डा जनजीवन योजनेचे काम सुमारे एक ते दीड वर्षापासून सुरू आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून यासाठी सुमारे साडे तीन कोटींचा निधी मंजूर आहे. आता तरी गावाला मुबलक नाही परंतु पिण्याचे पाणी मिळेल म्हणून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. परंतु हे समाधान काही क्षणा पुरतेच होते. या योजनेत वापरण्यात आलेले पाईप हे निकृष्ट दर्जाचे असल्याने पाणी सोडल्यानंतर मागे पाईप फेकून दिले जातात मग ही योजना पाण्याची नसून फक्त खाण्याची आहे का अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांसह ग्रामस्थांनी दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आडकला जाळ्यात; नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर । नगर सहयाद्री बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्‍याला...

बाप-लेकाच्या नात्याचा भयानक शेवट! जन्मदात्या मुलाने बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...