नगर सहयाद्री टीम-
हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा हा सण विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नावांनी, सांस्कृतिक श्रद्धा आणि उत्सवाच्या रुपात हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवशी सूर्योदयानंतर घरासमोर गुढी उभारून तिची पूजा केली जाते.
गुढीपाडव्याला प्रत्येक राज्यात विविध नावांनी ओळखले जाते. कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये गुढीपाडव्याला युगादी किंवा उगादी असे म्हणतात. पाडवा या शब्दाचा संस्कृत मराठी अपभ्रंश पडव, पाडवो. या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला. चैत्रशुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून याला चैत्रपाडवा असे देखील म्हटले जाते
गुढीपाडव्याच्या दिवशी नांगरणीला का करतात सुरवात?
मराठी नववर्षाच्या याच दिवसापासून शेतकऱ्यांचेही शेती व्यवसयातील नववर्ष सुरु होते. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच या नववर्षीची सुरवात केली जाते. काळाच्या ओघात शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. या काळात शेतकऱ्यांनी काही परंपरा या बदलत्या वातावरणामध्येही कायम ठेवलेल्या आहे.एका प्रथेनुसार पेरणी झाल्यावर रब्बी पीक काढल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी चांगले पीक यावे या उद्देशाने शेतकरी शेतात नांगरणी करतात अशी देखील मान्यता आहे.