spot_img
अहमदनगरनगरमध्ये चाललंय काय! सासुरवाडीने केला जावयाचा घात..? नेमकं प्रकरण काय, पहा..

नगरमध्ये चाललंय काय! सासुरवाडीने केला जावयाचा घात..? नेमकं प्रकरण काय, पहा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
पाथर्डी रस्त्यावरील चाँदबिवी महाल परिसरात बारदारी शिवारात एका जणांचा मृतदेह आढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत जगन्नाथ घाटबिसावे (वय २८ रा. केळ पिंपळगाव ता. आष्टी, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पती पत्नीच्या वादातून सासुरवाडीत दारू पाजून मारहाण करून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी मयत प्रशांत यांचा चुलत भाऊ किशोर बापुराव घाटविसावे (वय ३६ रा. केळ पिंपळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात मयत प्रशांत यांच्या पत्नीसह सहा जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी कल्याणी प्रशांत घाटविसावे (मूळ रा. केळ पिंपळगाव, हल्ली रा. शास्त्रीनगर, केडगाव), सोमनाथ बनकर, मेव्हणा अजय सोमनाथ बनकर, सासू वैशाली सोमनाथ बनकर, मेव्हणी प्रियंका सोमनाथ बनकर (सर्व रा. शास्त्रीनगर, केडगाव), अजयचा मेव्हणा मोहित दिनेश पाडळे (रा. भोरी चाळ, रेल्वे स्टेशन रस्ता, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय?
प्रशांत घाटविसावे व त्यांची पत्नी कल्याणी यांच्यात वाद झाले होते. प्रशांत हे सासुरवाडी केडगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. मंगळवारी त्यांना संशयित आरोपी यांनी दारू पाजून मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रशांत यांचा मृत्यु झाला. दरम्यान त्यांचा मृतदेह पाथर्डी रस्त्यावर चांदबिबी महाले फाट्याच्या पुढे रस्त्यापासून काही अंतरावर बारदी शिवारात टाकून दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...