पुणे। नगर सहयाद्री-
पुण्यामध्ये अपहरण करून ३ तरुणांसह एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्याच्या शिक्रापूरमध्ये घडली आहे. चौघांनाही हात-पाय बांधून, लाथा-बुक्क्यांनी आणि कोयत्याने जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी: पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील ३ तरुणांसह एका महिलेला काही अज्ञात लोकांकडून अपहरण करण्यात आले होते. कारमधून अज्ञातस्थळी घेऊन जाऊन या चौघांनाही लाठ्याकाठ्या, कोयता, तलवारीसह हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली असल्याचे व्हायरल व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
मारहाण करू नये यासाठी तो विनंती करत आहे तरी देखील त्याला जमिनीवर लोळेपर्यंत मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचे हात-पाय बांधल्याचे दिसत आहे. त्याचे पाय खिडकिला बांधले आहेत. त्याला देखील बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
महत्वाचे म्हणजे ही घटना होऊन दोन दिवस झाले तरी देखील अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यामुळे पोलीस काय भूमिका घेणार याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे.