spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी काय घोडं मारलं? शरद पवार यांनी साधला निशाणा

महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी काय घोडं मारलं? शरद पवार यांनी साधला निशाणा

spot_img

शेवगाव | नगर सह्याद्री
केंद्र सरकारनेे गुजरातमधील शेतकर्‍याने पिकविलेल्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली. गुजरातचे शेतकरी आमचे शत्रू नाहीत. त्यांचा कांदा निर्यात झाला तर आम्हाला आनंद आहे. मात्र गुजरातच्या कांद्याला परवानगी मिळत असताना महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी काय घोडं मारलं? असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पवार हे बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, सुभाष लांडे, राजेंद्र फाळके, प्रभावती घोगरे, शिवशंकर राजळे, नितिन काकडे, बंडू रासणे आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, कांदा जिरायत शेतकर्‍याचे महत्वाचे पिक. केंद्र सरकारने निर्णय घेतला कांदा देशाबाहेर पाठवायचा नाही, परराज्यात पाठवायचा नाही. शेतकर्‍याच्या हाती दोन पैसे मिळत असताना कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. साखर, उसाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य अव्वल आहे. या उद्योगातून विविध उपपदार्थांची निर्मिती केली जाते. या उद्योगाचे धोरणही बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याने केंद्रातील सरकार शेतकर्‍यांना न्याय देणारेे नसल्याचा घणाघात पवार यांनी केला. या भागातील शेतीला पाणी हवे आहे.

पाणी असेल तर सोने पिकविण्याची धमक बळीराजात आहे. ताजनापुरच्या पाणी योजनेची चर्चा अनेक वर्षांपासून होत आहे. रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीचीही आवश्यकता आहे. १३ मे नंतर निवडणूकीची प्रक्रिया संपल्यानंतर ताजनापुर योजना, औद्योगिक वसाहतीसाठी आम्ही प्रयत्न करू असे पवार म्हणाले. विरोधी उमेदवार हे त्यांची सत्ता जनतेसाठी नव्हे तर प्रतिष्ठेसाठी वापरत आहेत. आम्ही एखाद्या हॉटेलवर बसलो तरी त्या हॉटेलवर दुसर्‍या दिवशी कारवाई केली जाते. आमच्यासोबत फिरले तर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. त्यांच्याकडून सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरू असल्याची टीका नीलेश लंके यांनी केली.

देशात इतिहास घडवायचा आहे: आ. थोरात
जनतेचा उमेदवार कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे नीलेश लंके होय. या गडयाने या मतदार संघात काय जादू केली माहीती नाही. रात्री दोन वाजेपर्यंतही त्यांची लोक वाट पाहत असतात. पारनेरमध्ये गेल्यानंतर त्यांच्या कामाचे कौतुक ऐकण्यास मिळते. विरोधी उमेदवाराला सत्तेचा पैशांचा दर्प झाला असून त्यांचे गर्वहरण करण्यासाठी नीलेश लंके यांना विजयी करून देशात इतिहास घडवायचा आहे. हा लोकशाहीचा विजय ठरणार आहे. विरोधी उमेदवार मोठी पार्टी आहे. त्यांना मदत केली काय, नाही केली काय सर्वांना त्रास देणे त्यांचा पिंड असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...